अंबाजोगाईतील पुलासाठी आ. नमिता मुंदडा यांनी आणला ५.५ कोटींचा निधी


शहरातील अभियांत्रिकी महाविद्यालय जवळील जीर्ण झालेला जुना दगडी पूल पडून तिथे नवीन नवीन पूल उभारण्यासाठी आ. नमिता मुंदडा यांनी प्रयत्नपूर्वक पाठपुरावा करून साडेपाच कोटींचा निधी मंजूर करून घेता आहे.
ऐतिहासिक दगडी पुल होणार जमीनदोस्त !
अंबाजोगाई शहरातील माता रमाई आंबेडकर चौकापासून अभियांत्रिकी महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रोडवर वन विभागाच्या कार्यालयासमोर असणारा जुना दगडी पूल जीर्ण झाला होता. निजाम कालीन राजवटीत निजाम सैन्याच्या रहदारीसाठी निजिमाने या पुलाची निर्मिती केली होती. पुढे हा पुल दगडु पुलम्हणून ओळखल्या जायचा. निजाम काळात बांधण्यात आलेल्या या दगडी पुलाचे आयुष्य संपले असल्यामुळे हा पुल जमीनदोस्त करुन या ठिकाणी अद्यावत नवीन पुल बांधण्यासाठी हा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
पुल दुरुस्तीची होवू लागली होती मागणी
कालौघात रस्त्याच्या तुलनेत पूल अरुंद आणि कमी उंचीचा झाला होता. परिणामी अनेकदा लहानमोठे अपघात होऊन वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याने नवीन रुंद आणि उंच पुलाची मागणी होऊ लागली होती. याची दखल घेत केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी नवीन पुलाच्या निर्मितीसाठी शासनाकडे पाठपुरावा सुरु केला होता. अखेर आ. मुंदडा यांच्या प्रयत्नांना यश आले असून शासनाने या पुलासाठी ५ कोटी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन पुलाच्या कामाला सुरुवात होणार आहे. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे, खा. प्रीतमताई मुंडे यांचे आ. नमिता मुंदडा यांनी आभार मानले आहेत.