महाराष्ट्र

अंबाजोगाईत महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या बीजप्रक्रिया केंद्र निर्मितीसाठी पाच एकर जमीन उपलब्ध

ना. धनंजय मुंडे माजी आमदार संजय दौंड यांचे प्रयत्न; ना. अब्दुल सत्तार यांचे शिक्कामोर्तब!

अंबाजोगाई येथे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अकोला यांच्या बीजप्रक्रिया निर्माण करणा-या केंद्रासाठी कृषी, पशुसंवर्धन व मत्स व्यवसाय विभागाच्या वतीने पाच एकर जागा हस्तांतरित करण्याबाबतच्या शासकीय निर्णयावर आज अखेर शिक्कामोर्तब झाले. या विभागाचे मंत्री ना. अब्दुल सत्तार यांनी या आदेशावर आज स्वाक्षरी करुन शासन निर्णय काढला आहे.
अंबाजोगाई येथे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे बीजप्रक्रिया केंद्र निर्माण व्हावे यासाठी विधानसभा परीषदेचे माजी सदस्य संजय दौंड यांनी आपल्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात जोरदार प्रयत्न केले होते. बीड जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी या केंद्रासाठी शासकीय जमीन उपलब्ध करून देण्यासाठी आपली शक्ती पणाला लावली होती. मात्र राज्यात वेगाने झालेल्या राजकीय हालचालींमुळे त्याकाळी हा निर्णय काढता आला नव्हता. आता राज्य मंत्रिमंडळाच्या फेरबदलानंतर विधानसभा परीषदेचे माजी सदस्य संजय दौंड यांनी मुंबईत तळ ठोकुन विद्दमान मंत्री ना. धनंजय मुंडे यांचे राजकीय वजन वापरून कृषीमंत्री ना. अब्दुल सत्तार यांच्या कडील कृषी, पशुसंवर्धन व मत्स व्यवसाय विभागाच्या वतीने यासंदर्भातील केंद्राच्या निर्मितीसाठी शासनाची पाच एकर जागा उपलब्ध करून देणारा शासकीय आदेश काढण्यात यश मिळवले आहे.

या संदर्भातील शासकीय आदेशात पुढे असे म्हटले आहे की,
ज्ञापन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत सिताफळ संशोधन अंबाजोगाई जि. बीड याना शा.नि.क्र. टिएसएफ- १०७२/११३३६५/ए-१, दि. ४/ १२/ १९७३ नुसार तालुका बिज गुणन २०२४ क्षेत्र ५ वर्षाकरिता नाममात्र भाडेतत्वावर रु.५/- प्रती वर्षी याप्रमाणे लिजवर देण्यात आलेले आहे. तद्नंतर शासन पत्र क्र.टि.एस.एफ- १०४९४४९४६ (४८७/३ मे, दि.१८/१२/१५७९ नुसार प्रक्षेत्र विद्यापीठाकडे माहवार दि.२९/०२/१९८० पर्यंत सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानंतर शा.नि.क्र.म.पु.वि. १३९१/सी.आर.१७/२०-अ, दि.७/५/१९९७ नुसार सन९९७-९८ या वर्षापासून सिताफळ संशोधन केंद्र कार्यान्वित करण्यात आलेले आहे. विद्यापीठास लिजवर देण्यात आलेल्या २९०० हेक्टर क्षेत्र सन १९९८ मध्ये मा. कुलगुरु, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांच्या मान्यतेने सिताफळ संशोधन केंद्रास हस्तांतरीत करण्यात आलेले आहे.
शासन निर्णय क्र.टिएसएफ- १००२/१९३३६५/९-१ दि.०४/ १२/ १९७३ मुसार तालुका बीज गुणन केंद्राची जमीन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठास ५ वर्षाकरीता देण्याचा करार होता त्यानंतर सदर क्षेत्र विद्यापीठाकडे कायमस्वरूपी हस्तांतरीत करून घेण्यासाठी कार्यकारी परिषदेने दि. ०७/११/२००४- रोजी राव. ५७/४, ५८/४ व ५९/४ नुसार मंजुरी दिली आहे व सदर प्रकरणी विद्यापीठाने त्याच्या पत्र दि.१४/६/२००९ दि.१२/२/२००९ नुसार शासनास प्रस्ताव सादर केलेला आहे.


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत सिताफळ संशोधन केंद्र अंबाजोगाई येथील ५ एकर जमीन महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, अकोला यांना बिज प्रक्रिया केंद्र स्थापन करण्याकरीता देण्याबाबत महाबीजने कृषि आयुक्तालयास मागणी केलेली आहे. महाबीज महामंडळाचा प्रस्ताव विचारात घेता सदरच्या जागेची महामंडळास आवश्यकता असल्याचे दिसून येत आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परमणी अंतर्गत सिताफळ संशोधन केंद्र, अंबाजोगाई येथील ५ एकर जमीन महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, अकोला यांना बिज प्रक्रिया केंद्र स्थापन करण्याकरीता हस्तांतरीत करण्यापूर्वी महसूल विभागाच्या दि. ८/ ९/२००८ रोजीच्या शासन परिपत्रकानुसार महसूल व वन विभागाच्या परवानगी शिवाय जमीन हस्तांतरणावर निर्बंध घालण्यात आलेले आहेत. तसेच शासकीय विभागांना प्रदान केलेल्या शासकीय जमिनी संदर्भात अशा जमिनीची शासकीय विभागांना आवश्यकता नसल्यास त्या विभागाने अशा जमिनी महसूल विभागाच्या सहमतीने महसूल विभागाकडे प्रत्यार्पित करणे आवश्यक आहे.
राज्यात एकूण ३५७ तालुके असून तालुका बिजगुणन केंद्रांची संख्या केवळ १९२ इतकी आहे. तालुका बिजगुणन केंद्राच्या जमिनी या तालुक्यांचा विकास होताना शहरी भागात आल्याने विविध खाजगी. व्यापारी, सहकारी, शासकीय, निम शासकीय, संस्थांकडून तालुका निजगुणन केंद्रांच्या जमिनीची मागणी वेगवेगळ्या प्रयोजनासाठी करण्यात येते. म्हणून शासनाने शासन परिपत्रक क्र.ताबिके २०१५/प्र.क्र.४३/१- ए. दिनांक ८ सप्टेंबर, २०११ अन्वये तालुका बीजगुणन केंद्राच्या जमिनी कृपक अथवा अकृषक कामासाठी न देणेबाबत धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे.
उक्त शासन निर्णयातील परिच्छेद क्र. २ नुसार तालुका बिजगुणन केंद्रावरील बिजोत्पादन कार्यक्रम वाढवून शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे बियाणे उपलब्ध करुन देणे, तसेच स्थापित कृषि चिकित्सालयावर शेतकऱ्यांमार्फत प्रगत कृषि तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार परिणामकारकरित्या करणे व विकसित तंत्रज्ञान जलद गतीने पोहोचविणे हा मुख्य उद्देश आहे. ही बाब पाहता वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी अंतर्गत सिताफळ संशोधन केंद्र, अंबाजोगाई येथील ५ एकर जमीन महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, अकोला यांना बिज प्रक्रिया केंद्र स्थापन करण्यासाठी जमिनी हस्तांतरीत करण्याकरिता महसूल वन विभागाकडे प्रत्यार्पित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे. त्याअनुषंगाने सदर जमीन महसूल व वन विभागाकडे प्रत्यार्पित करण्यात येत आहे.
महसूल व वन विभागाच्या आदेशानंतर जमीन वाटप करताना जमिनीचा निश्चित कोणता हिस्सा प्रत्यार्पित करावयाचा आहे, या संदर्भात जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, बीड यांच्या सल्ल्याने जिल्हाधिकारी, बीड यांनी जमिनीचे आरेखन निश्चित करुन व मोजणी करुन जमीन हस्तांतरणा बाबतची कार्यवाही करावी.
हे शासन ज्ञापन महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे. याच संगणक सांकेतांक २०२३०७१०१५४१०७५३०१ असा आहे. हे ज्ञापन डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे. या शासन निर्णयावर महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने कृषी, पशुसंवर्धन व मत्स व्यवसाय विभागाचे उपसचिव हेमंत गोरखनाथ म्हापणकर यांची स्वाक्षरी आहे.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker