अंबाजोगाईत दुकान फोडणीचे सत्र सुरुच; पाच दुकाने पुन्हा फोडली!
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/choriiiiiiii-921x1024.gif)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/choriiiiiiii-921x1024.gif)
अंबाजोगाई शहरातील दुकान फोडणीचे सत्र काही केल्या थांबते नाव घेईनासे झाले आहे. आठदिवसापुर्वीच मोंढा विभागातील पाच दुकाने फोडल्याची घटना ताजी असतानाच आता पुन्हा शहरातील पाच मेडिकल स्टोअर्स फोडल्याची घटना घडली आहे. या दुकान फोडीच्या सत्रामुळे दुकान मालकात अस्वस्थता निर्माण झाली आहे.
परळी रोड वरील पाच मेडिकल दुकाने फोडली
भगवान बाबा चौक ते योगेश्वरी नूतन विद्यालय समोरील रोडवर असलेल्या मेडिकल शॉप वर चोरांचा पहाटेच्या सुमारास एक नवे दोन नवे तब्बल पाच मेडिकल स्टोअर वर चोरांचा डल्ला दुकानाचे शटर लोखंडी सळीने उचलून दुकानाच्या आत प्रवेश केला गल्ल्यात असलेली चिल्लर स्प्रे बॉडी ब्रँडेड कंपनीचे स्प्रे पाच दुकानातून घेऊन पसार झाले एकंदरीत किती रुपयाचे नुकसान झाले अद्याप कळू शकले नाही.
दुकानदारात भितीचे वातावरण
पण या घटनेवरून अंबाजोगाईच्या दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आसुन पुन्ह्या एकदा कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला ह्या अशा घटना मागील दोन महिन्यापासून अंबाजोगाई शहरात वारंवार घडत असल्यामुळे व्यापारी वर्गात दबक्या आवाजात कायदा सुव्यवस्था कमकुवत पावली का ? असा खडा सवाल होत आहे.
शहरातील परळी रोड वरील माऊली मेडिकल भगवान बाबा चौक, न्यू राज मेडिकल, साक्षी एजन्सी विवेकानंद नगर, साया मेडिकल व इतर या दुकानाचे आर्थिक नुकसान झाले आहे.