अंबाजोगाईत चंद्रशेखर बावणकुळे यांच्या प्रतिमेला बाव्वणजोड्यांचा मार


भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे यांनी अलिकडेच पत्रकारांमध्ये जे लांच्छनास्पद वक्तव्य केले त्याचा निषेध नोंदवण्यासाठी आज मराठी पत्रकार परीषदेच्या शाखेच्या वतीने बावणकुळे यांच्या प्रतिमेला बावणजोडे मारण्याचा उपक्रम राबविण्यात आला.
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे यांनी अलिकडेच पत्रकारांनी २०२४ पर्यंत आपल्याविरोधात एकही बातमी छापू नये, यासाठी त्यांना चहा प्यायला घेऊन जा, त्यांना चहा प्यायला बोलवायचे म्हणजे समजलेच असेल तुम्हाला, असे सांगत त्यांना ढाब्यावरही घेऊन जा, असा भाजपा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिला होता.


बावनकुळे यांच्या उपस्थितीत रविवारी (दि. २४) सावेडी येथील माउली सभागृहात महाविजय २०२४ विधानसभा पदाधिकारी संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत “जबाबदाऱ्या” या विषयावर बावनकुळे बोलत होते. यावेळी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतांना ते म्हणाले की, ज्या बूथवर तुम्ही काम कराल तेथे इलेक्ट्रॉनिक मीडियावाले कोण आहेत, पोर्टलवाले कोण आहेत हे पाहावे. आपण एवढे चांगले काम करतोय, पण हे असे काही टाकतात की, जणू गावात बॉम्बच फुटलाय.


यासाठी बूथवर जे चार, पाच पत्रकार आहेत त्यांची यादी तयार करा. यात एक दोन पोर्टलवाले, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिकवाले असतील, त्यांना महिन्यातून एकदा चहा प्यायला बोलवा, चहा प्यायला बोलवायचे म्हणजे समजलेच असेल तुम्हाला त्यात काही कमी जास्त झाले तर धाब्यावर जेवायला ही घेवून जा. महाविजय २०२४ पर्यंत बूथसंदर्भात एकही बातमी विरोधात येणार नाही याची काळजी घ्या, सर्व सकारात्मक बातम्या आल्या पाहिजेत, याची काळजी घ्या, असे बावनकुळे म्हणाले.
पत्रकारांबध्दल काढलेल्या या लांच्छनास्पद उद्गारामुळे बावणकुळे यांच्या विरोधात संपुर्ण महाराष्ट्रात रोष निर्माण झाला होता. या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यासाठी मराठी पत्रकार परीषदेच्या वतीने आज शहरातील नगर परिषद कार्यालय व्यापारी संकुलात चंद्रशेखर बावणकुळे यांची प्रतिमा गाढवाच्या गळ्यात लटकावून त्या प्रतिमेला बावणे जोडे मारण्याचा उपक्रम राबविण्यात आला. मराठी पत्रकार परीषदेच्या पत्रकार हल्ला नियंत्रण समितीचे जिल्हा निमंत्रक दत्तात्रय अंबेकर, तालुका अध्यक्ष अशोक दळवी, संघाचे तालुकाध्यक्ष गजानन मुडेगावकर यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी मराठी पत्रकार परिषदेच्या अंबाजोगाई शाखेतील सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.