अंबाजोगाई केज नेकनुर मांजरसुंबा रेल्वेच्या नकाशावर आणण्यासाठी रेल्वे राज्यमंत्री खा. दानवे यांना दिले निवेदन
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/10/IMG_20221009_203118.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/10/IMG_20221009_203118.jpg)
माजी आमदार पृथ्वीराज साठे यांचा पुढाकार
अंबाजोगाई (प्रतिनिधी)–
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई केज नेकनुर मांजरसुंबा या प्रलंबित रेल्वेमार्गाच्या मंजुरीसाठी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांना निवेदन दिले.
माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनी या संदर्भात पुढाकार घेतला. यावेळी माजी मंत्री आ. धनंजय मुंडे, राष्ट्रवादी चे जिल्हाध्यक्ष ऍड. राजेश्वर चव्हाण, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी व इतर मान्यवर उपस्थित होते.
या संदर्भात देण्यात आलेल्या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई हे शहर रेल्वेच्या नकाशावर यावे ही मागणी भारताला स्वातंत्र्य मिळण्यापुर्वी पासुनची आहे. सध्या अर्धवट झालेला परळी, बीड नगर हा लोहमार्ग परळी, अंबाजोगाई, केज, नेकनुर मांजरसुंबा मार्गे नगरला जाणार होता. मात्र राजकीय इच्छाशक्तीने हा मार्ग बदलुन तो परळी, शिराळा, माजलगाव, बीड मार्गे नगरला नेण्यात आला.
परळी, अंबाजोगाई, केज, नेकनुर, मांजरसुंबा या लोहमार्गावर सतत लहान मोठ्या गावांची वस्ती असल्यामुळे हा लोहमार्ग सर्वात अधिक प्रवासी अधिभार देणारा लोहमार्ग ठरणार आहे.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/10/IMG_20221009_203309.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/10/IMG_20221009_203309.jpg)
बीड जिल्ह्यातील ही महत्वाची गावे रेल्वेच्या नकाशावर आणण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडे १) घाटनांदुर, अंबाजोगाई, केज, नेकनुर, मांजरसुंबा, श्रीगोंदा हा नियोजित रेल्वे मार्ग मंजुरीसाठी प्रस्तावित आहे. या मार्गाच्या सर्वेक्षणासाठी सुरेश प्रभु रेल्वे मंत्री असताना ३४ लक्ष रुपये खर्चून सर्वे ही करण्यात आला आहे. मात्र हा लोहमार्ग आजही मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.
२) “घाटनांदुर-श्रीगोंदा” या लोहमार्गाशिवाय रेल्वे मंत्रालयाकडे लातुर तुळजापूर अंबाजोगाई खामगाव
हा रेल्वेमार्ग मंजुरीसाठी प्रस्तावित आहे. हा रेल्वेमार्ग तीर्थक्षेत्रांच्या जोडणारा लोहमार्ग म्हणून ओळखला जातो. ” लातुर उदगीर बोधन सोलापुर उस्मानाबाद तुळजापुर घाटनांदुर अंबाजोगाई बीड जालना खामगाव” असा हा लोहमार्ग आहे. या मार्गावर बोधन, तुळजापूर आणि अंबाजोगाई ही तीन तीर्थक्षेत्र येतात. म्हणून तीर्थक्षेत्र लोहमार्ग म्हणून हा लोहमार्ग ओळखला जातो.
आणि ३) सोलापुर, उस्मानाबाद, अंबाजोगाई, बीड , औरंगाबाद हा लोहमार्ग मंजुरीसाठी प्रस्तावित आहे.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/10/IMG_20221009_203338.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/10/IMG_20221009_203338.jpg)
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई, केज, नेकनुर, मांजरसुंबा या नियोजित लोहमार्ग हा सर्वाधिक प्रवासी अधिभार म्हणून ओळखला जाईल असं रेल्वे मंत्रालयाच्या सर्व्हेक्षण अहवालात नमुद करण्यात आल एज आहे, तरी सुध्दा केवळ राजकीय इच्छाशक्ती नसल्यामुळे हा लोहमार्ग मंजुरी अभावी गेली अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत.
आपणास नम्र विनंती की, आपण वरील तीन पैकी कोणताही एक नवीन लोहमार्ग मंजुरी करुन बीड जिल्ह्यातील विकासापासून वंचीत असलेली ही गावे रेल्वेच्या नकाशावर आणण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी विनंती करण्यात आली आहे.