अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीचे वर्चस्व


आ. धनंजय मुंडे आणि माजी आ. संजय दौंड बनले विजयाचे शिल्पकार!
बीड जिल्ह्यात सर्वांचे लक्ष असलेल्या अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. या निवडणुकीत 18 पैकी 15 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होत अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीवर एक हाती सत्ता मिळवली आहे. या निवडणुकीत व्यापारी मतदारसंघ आणि हमाल माथाडी मतदार संघातुन एकुण 3 जागांवर भाजपाचे उमेदवार विजयी झाले आहेत. महाविकास आघाडीकडे निर्विवाद वर्चस्व मिळवून देणा-या या निवडणुकीच्या शिल्पकार आ. धनंजय मुंडे आणि माजी आमदार संजय दौंड हे ठरले आहेत.


अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समिती ही परळी आणि केज विधानसभा मतदारसंघ अंतर्गत संयुक्त येत असलेली बाजार समिती आहे. महाविकास आघाडीने ही निवडणूक माजी सामाजिक न्याय मंत्री आ. धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली लढवली. आ. धनंजय मुंडे यांनी या निवडणुकीची सर्वस्वी जबाबदारी आपले विश्वासू सहकारी माजी आ. संजय दौंड आणि यांच्यावर सोपवली होती. ही जबाबदारी संजय दौंड यांनी अतिशय नियोजनबद्ध प्रचारयंत्रणा राबवून अत्यंत यशस्वीरित्या पार पडली. संजय दौंड यांचे समवेत माजी आमदार पृथ्वीराज साठे, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, दत्तात्रय पाटील, विलास सोनवणे माजी उपनगराध्यक्ष बबन लोमटे यांच्या सह महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी अत्यंत यशस्वीपणे पार पडली. आणि अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीवर आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले.


राष्ट्रवादी आणि भाजपा मध्ये होती सरळ लढत!
18 संचालकांनी होवू घातलेली ही निवडणुक तसे पहाता राष्ट्रवादी आणि भाजाप यांच्या मध्येच सरळ झाली होती. या निवडणुकीत भाजपाच्या वतीने पंकजा मुंडे, नंदकिशोर मुंदडा, आ. नमिता मुंदडा, अक्षय मुंदडा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. तर महाविकास आघाडीच्या प्रचार यंत्रणेत आ. धनंजय मुंडे, माजी आमदार संजय दौंड, माजी आमदार पृथ्वीराज साठे, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, माजी उपनगराध्यक्ष बबन लोमटे या प्रमुख नेत्यांनी प्रवेश यंत्रणेत सक्रिय सहभाग घेतला होता.


हे आहेत विजयी उमेदवार
या निवडणुकीत
सोसायटी सर्वसाधारण मतदार संघातुन राजेश्वर बाळासाहेब चव्हाण, रामलिंग चत्रभुज चव्हाण, दत्तात्रय ज्ञानोबा पवार(पाटील), ताराचंद श्रीमंत शिंदे, विलास दत्तात्रय सोनवणे, शिवाजी प्रभाकर सोमवंशी, बाळासाहेब मधुकरराव सोळंके,
सोसायटी महिला राखीव गटातुन
सरस्वती भाऊसाहेब आगळे, सुचिता अजित देशमुख
सोसायटी विजामप्र/विमाप्र गटातुन गौतम चंद्रकांत चाटे
सोसायटी इतर मागास गटातुन अजय उर्फ चिमू शेषेराव पाटील,
ग्रामपंचायत सर्वसाधारण गटातुन आनंद उर्फ बाळासाहेब देसाई देशमुख, सत्यजित शंकरराव सिरसाठ,
ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातुन लक्ष्मण ज्ञानोबा करनर,
ग्रामपंचायत अनुसूचित गटातुन थांबा बाबुराव लांडगे,
हमाल मापाडी, व्यापारी मतदार संघावर नंदकिशोर मुंदडा यांची पकड कायम!
व्यापारी गटातुन भुषण मधुकरराव ठोंबरे, पुरुषोत्तम भगवानदास भन्साळी
हमाल माथाडी गटातुन जलाल इमाम गवळी हे विजयी झाले आहेत.