युट्युब चालक पत्रकारने केला तरुण प्रेयसीचा खून
युट्यूबरने आधी प्रेयसीचा गळा चिरला, त्यानंतर मृतदेहाचे तुकडे घेऊन पोलिसात पोहचला
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/08/IMG_20220817_175121.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/08/IMG_20220817_175121.jpg)
औरंगाबाद शहरात महाराष्ट्राला हादरवून सोडणारी एक धक्कादायक घटना समोर आलीय. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी औरंगाबाद शहरात आलेल्या तरुणीचा एका युट्युब चॅनलच्या पत्रकाराने एका खून केल्याची घटना समोर आलीय. यानंतर खुनी पत्रकाराने औरंगाबाद ग्रामीणमधील देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात खुनाची कबूल दिली. सदरील तरुणी ही या तरुणाची प्रेयसी असल्याची माहिती मिळते. मात्र या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.
अंकिता असे या तरुणीचे नाव असून ती जालना जिल्ह्यातली आहे. ती एमपीएससी, यूपीएससी स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करण्यासाठी औरंगाबाद शहरामध्ये आलेली होती. मात्र, एका युट्युब चॅनलच्या पत्रकाराने या तरुणीचा खून केला. तसेच यानंतर खुनी पत्रकाराने पोलीस ठाण्यात जाऊन आणि पत्रकारांच्या व्हाट्सअप ग्रुपवर याबाबक माहिती पाठवून खुनाची कबुली दिली आहे. आरोपी खुनी पत्रकाराने औरंगाबाद ग्रामीणमधील देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात खुनाची कबूल दिली.
या दोघांची एंगेजमेंट झाली असल्याची चर्चा आहे. मात्र, याबद्दल सविस्तर माहिती आलेली नाही. तर हा खून प्रेम प्रकरणातून झाला असावा, अशी शंका शेजारी आणि आजूबाजूला राहणारे नागरिक व्यक्त करत आहेत. खून झालेल्या तरुणीचा आणि आरोपी तरुणाचा सोबत असलेला फोटो या दोघांची चांगलीच जवळील असल्याचे सांगून जातो.
दोघांमध्ये विवाहबाह्य संबंध
सौरभ राहत असलेल्या शिऊरमध्येच अंकिता पती आणि मुलासह राहत होती. दोघांचे घर आजूबाजूलाच असल्याने दोघांमध्ये विवाहबाह्य संबंध प्रस्थापित झाले. त्यामुळे सौरभच्या सांगण्यावरून अंकिताने पतीला सोडून शहरात भाड्याने खोली घेऊन राहण्याचा निर्णय घेतला. याच काळात ती स्पर्धा परीक्षेची तयारी करू लागली. सौरभही तिच्याकडे येत असे आणि आर्थिक रसद सुद्धा पुरवत होता.
हत्या करून पोत्यात भरले…
गेल्या काही दिवसांपासून अंकिताने आपण आता लग्न करून घेऊ असा तगादा सौरभच्या मागे लावला होता. मात्र तिची समजूत काढून प्रत्येकवेळी सौरभ विषय बदलायचा. पण आता अंकिताचा लग्नाचा जोर अधिकच वाढला होता. त्यामुळे तीन दिवसांपूर्वी अंकिताला भेटायला आलेल्या सौरभने तिची गळा चिरून हत्या केली. त्यांनतर तेथून निघून गेला. आज सकाळी पुन्हा आला आणि मृतदेहाचे तुकडे करून पोत्यात भरले.
पोलिसांना धक्काच बसला…
सौरभने मृतदेहाचे तुकडे एका पोत्यात भरून कारमध्ये टाकून शहराच्या बाहेर पडला. मात्र रूम उघडाच सोडल्याने शेजाऱ्यांना वास आला आणि आतमध्ये जाऊन पाहीले तर काही मृतदेहाचे तुकडे रूममध्ये पडलेले होते. याचवेळी सौरभ मृतदेह घेऊन देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात घेऊन पोहचला. आपण हत्या केल्याची कबुली देत त्याने मृतदेह दाखवला. यावेळी पोलिसांना धक्काच बसला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन शहर पोलिसांना याची माहिती दिली.