राष्ट्रपत्नी? करोडपती, लखपती, राष्ट्रपती, …या शब्दांच्या पुढे का लावतात पती?
why not? 'Rashtrapatni'


कॉंग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी (Congress MP Adhir Ranjan Chaudhary) यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांच्याबद्दल केलेल्या एका टिपण्णीमुळे सध्या मोठा गोंधळ माजला आहे. या प्रकरणावरून संसदेत मोठा गदारोळ झाला. भारतीय जनता पक्षाकडून याचा जोरदार निषेध नोंदवण्यात आला असून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Union Minister Smriti Irani) यांनीही कॉंग्रेस पक्षावर निशाणा साधला आहे. अधीर रंजन चौधरी यांच्या वक्तव्याबद्दल सोनिया गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी करण्यात येत आहे. “काँग्रेस हा महिलाविरोधी पक्ष आहे. काँग्रेस आदिवासी विरोधी पक्ष आहे. आदिवासी राष्ट्रपती काँग्रेसला सहन होत नाही. त्यांच्या डोळ्यात खुपतं. काँग्रेसने राष्ट्रपतींची खिल्ली उडवली आहे. काँग्रेस पक्षाने द्रौपदी मुर्मूची माफी मागावी”, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. सध्या हे प्रकरण भलतेच तापलेले दिसत असून, त्याचे पडसाद संसदेच्या कामावरही पडण्याची शक्यता आहे.
काय आहे प्रकरण ?
एका मुलाखती दरम्यान कॉंग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा उल्लेख ‘राष्ट्रपत्नी’ असा केला. त्यावर भाजपच्या वतीने आक्षेप घेण्यात आला. त्यांच्या या विधानाची सर्वत्र चर्चा होत आहे. त्याचे पडसाद लोकसभेतही पाहायला मिळाले. चौधरी यांच्या विधानाची भाजपच्या वतीने गंभीर दखल घेण्यात आली असून, त्यांनी माफी मागावी, अशी मागणी सध्या केली जात आहे. सोशल मीडियावरही याप्रकरणावरून गदारोळ माजला आहे. दरम्यान काल संसदेत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना घेराव घालून घोषणाबाजी करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अधीर रंजन चौधरी यांनी केली आहे
कॉंग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी (Congress MP Adhir Ranjan Chaudhary) यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांच्याबद्दल केलेल्या एका टिपण्णीमुळे सध्या मोठा गोंधळ माजला आहे. याप्रकरणावरून संसदेत मोठा गदारोळ झाला. भारतीय जनता पक्षाकडून याचा जोरदार निषेध नोंदवण्यात आला असून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Union Minister Smriti Irani) यांनीही कॉंग्रेस पक्षावर निशाणा साधला आहे. अधीर रंजन चौधरी यांच्या वक्तव्याबद्दल सोनिया गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी करण्यात येत आहे. “काँग्रेस हा महिलाविरोधी पक्ष आहे. काँग्रेस आदिवासी विरोधी पक्ष आहे. आदिवासी राष्ट्रपती काँग्रेसला सहन होत नाही. त्यांच्या डोळ्यात खुपतं. काँग्रेसने राष्ट्रपतींची खिल्ली उडवली आहे. काँग्रेस पक्षाने द्रौपदी मुर्मूची माफी मागावी”, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. सध्या हे प्रकरण भलतेच तापलेले दिसत असून, त्याचे पडसाद संसदेच्या आजच्या कामावरही पडण्याची शक्यता आहे.
पती प्रत्यय लावण्यात आलेले शब्द :
क्षेत्रपती , करोडपती, लखपती, लक्ष्मीपती, राष्ट्रपती, उद्योगपती , प्रजापती, भूपती, वाचस्पती… इत्यादी