आयकर विभागाच्या धाडींमध्ये जप्त केलेल्या’ पैशांचं पुढे काय होतं?
What happens next to the 'seized' money in Income Tax department raids?
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/08/income-tax-raid-2.png)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/08/income-tax-raid-2.png)
जालन्यामध्ये आयकर विभागाने छापा टाकून तब्बल 390 कोटींच्या बेनामी संपत्तीचा पर्दाफाश केला आहे. कमालीची गुप्तता पाळून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही धाड टाकली. विशेष म्हणजे, राहुल आणि अंजलीच्या लग्नाला आल्याचे भासवून या आयकर विभागाने ही मोहीम फत्ते केली. पण, सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये काहीच हाती लागले नाही. पण, जेव्हा फॉर्महाऊसवर छापा टाकला तेव्हा नोटांची बंडल सापडली. जालन्यातील मोठे स्टील व्यापारी, रिअल इस्टेट डेव्हलपर आणि कापड व्यापारी यांचे कारखाने, घरे, फार्म हाऊस आणि कार्यालयांवर आयटीने कारवाई केली.
पण अनेकांना प्रश्न पडला असेल एवढी मोठी रक्कम आयकर विभागाकडे गेल्यावर त्याचं पुढे काय होतं. याबद्दल सविस्तर माहिती घेऊया.
आयकर नियमांनुसार, करदात्याच्या खात्यात येणाऱ्या पैशांवर निश्चितपणे कर आकारला जातो. जर करदात्याने अशा कोणत्याही पैशावर कर भरला नसेल, तर त्याने त्या पैशाचा स्रोत आणि त्या पैशावर कर का भरला नाही हे देखील सांगावे लागेल. उत्पन्नाचे स्रोत जाणून घेणे महत्त्वाचे आहे, अन्यथा अशा पैशामुळे तुमच्यावर कराचा मोठा बोजा पडू शकतो. आयकर कायद्याच्या कलम 69 अ अन्वये, जर एखाद्या व्यक्तीकडे पैसे, सोने, दागिने किंवा इतर कोणतीही मौल्यवान वस्तू आढळली ज्याचा खात्यात उल्लेख नाही आणि करदात्याने त्याच्या स्त्रोताबद्दल कोणतीही माहिती दिली नाही, किंवा जर अधिकारी दिलेल्या माहितीवर समाधानी नसेल, तर ते त्या व्यक्तीचे त्या वर्षाचे उत्पन्न मानले जाईल. नवभारत टाईम्सने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
आयकर नियमांनुसार, ज्या पैशांची माहिती प्राप्तिकर विभागाला दिली जात नाही, मोठ्या प्रमाणात कर भरावा लागतो. यामध्ये 60टक्के कर, 25 टक्के अधिभार आणि 6 टक्के दंडाचा समावेश आहे. म्हणजेच अशा पैशावर कर घेताना तो कोणत्या टॅक्स स्लॅबमध्ये पडतो हे पाहिले जात नाही, तर त्यावर 60 टक्के कर थेट आकारला जातो.
IT RAID मध्ये काय होते?
हा एक उपाय आहे जो घटनात्मकदृष्ट्या देखील वैध आहे. खालीलपैकी कोणत्याही परिस्थितीत छापा टाकला जातो: करचुकवेगिरीची विश्वसनीय माहिती; उदाहरणार्थ, प्राप्तिकर विभागाच्या गुप्तचर शाखेकडून प्राप्त झालेल्या अहवालातून कोणतीही चोरी
इन्कम टॅक्स Strike किती काळ टिकू शकतो?
कोणताही आयकर छापा केवळ जास्तीत जास्त 48 तास टिकू शकतो. करनिर्धारणकर्ता शोध वॉरंटची तपासणी करण्याचा तसेच उपस्थित असलेल्या अधिकृत आयकर अधिकाऱ्याच्या ओळखीची पुष्टी करण्याचा त्याचा अधिकार वापरू शकतो.