१ लाखांच्या नौकरी बाबत विनोद कांबळी यांचा अद्दाप निर्णय नाही!




आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धमाकेदार पदार्पण करणारा विनोद कांबळी सध्या मोठ्या आर्थिक अडचणीत आला असल्याची चर्चा गेली महिनाभरापासून सुरू आहे. या आर्थिक अडचणीतुन विनोद कांबळी यांना बाहेर काढण्यासाठी नगर येथील उद्दोजक संदीप थोरात यांनी विनोद यास १ लाख रुपये महिना असलेली नौकरी ची ऑफर दिली होती. मात्र आजपर्यंत तरी विनोद कांबळी यांनी ही ऑफर स्विकारलेली नाही. सदरील ऑफर स्विकारण्याबाबतचा निर्णय विनोद कांबळी याने अजूनही संबंधितांना कळलेला नाही.
प्रख्यात क्रिकेटर विनोद कांबळी यांनी महिनाभरापुर्वी एक व्हिडिओ शेअर करुन आपण आर्थिक अडचणीत असून केवळ ३० हजार रुपयांच्या मानधनावर आपली उपजिविका भागवावी लागत असल्याचे सांगितले होते. आपल्या कुटुंबाचा खर्च चालवण्यासाठी मैदानावर कोणतेही काम करण्याची त्याने तयारी दाखवली आहे.
५० वर्षीय विनोद कांबळी आर्थिक अडचणीत आल्यामुळे त्याला त्याच्या राहणीमाणावरुन त्याचे चाहते ओळखणार देखील नाहीत अशा अवस्थेत तो आहे. अलिकडेच विनोद कांबळी जेंव्हा एमसीए कॉफी शॉप मध्ये आला होता तेंव्हा पांढरी दाढी, डोक्यावर टोपी घातलेला विनोद फार बारीक दिसला. त्याच्या गळ्यात ना सोन्याची चेन, ना हातात ब्रेसलेट, ना मोठे घड्याळ होते. इतकच नाही तर त्याच्या मोबाइलची स्क्रीन देखील खराब झाली होती. असे त्याला प्रत्यक्ष पाहणा-या चाहत्यांचे म्हणणे आहे. विनोद कांबळी यांनी स्वतः व्हायरल केलेला व्हिडिओ पाहिल्यानंतर अहमदनगर येथील सह्याद्री मल्टीस्टेट चे चेअरमन संदीप थोरात यांनी विनोद कांबळी यास १ लाख रुपये महिना पगाराची ऑफर दिली होती. सह्याद्री मल्टीस्टेट च्या मुंबई येथे सुरू होणा-या नवीन ब्रॅंच मध्ये शाखा व्यवस्थापक या पदाची ही ऑफर होती.
विनोद कांबळी सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. शिवाय सध्याच्या घडीला त्याच्याकडं कोणतंही काम नाही. त्यामुळे तो ही जॉबची ऑफर स्वीकारेल असे वाटत आहे. पण अजून तरी तसे घडले नाही. कारण विनोद कांबळी यांनी अजून पर्यंत या जॉब बाबत कोणतेही उत्तर दिलेले नाही. त्यामुळे विनोद कांबळी ही जॉबची ऑफर स्वीकारेल कांदाही या बाबतची कोणतीही माहिती समोर आली नाही. पण कांबळीला जर खरच पैशाची गरज असेल तर त्यांच्यासाठी ही नौकरी सुवर्ण संधी ठरु शकणारी होती. कारण या नोकरीसाठी विनोद कांबळीला १ लाख रुपये एवढा महिन्याला पगार मिळणार होता. विनोद ही ऑफर स्विकारेल, असे वाटत होते. पण आतापर्यंत तसे घडलेले नाही. त्यामुळे आता विनोद कांबळी ही नोकरी स्विकारणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागेलेले आहे.