Crimeमहाराष्ट्र

लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेत अल्पवयीन मुलीवर चालत्या ट्रॅव्हल्समध्ये बलात्कार

चालत्या ट्रॅव्हल्समध्येच बलात्कार केल्याची घटना घडली,माझ्या सोबत लग्न करतो असे ...

शहरातील अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळवून घेवुन जात चालत्या ट्रॅव्हल्समध्येच बलात्कार केल्याची घटना घडली असुन आरोपीस बेड्या ठोकल्या आहेत.
मुलीच्या वडीलांनी तक्रारीत म्हटले आहे की, शहरातील मोलमजुरी करून पोटभरणाऱ्या कुटुंबातील मुलगी वय १७ वर्ष असुन आमच्या घराच्या भवती एक मुलगा चकरा मारात आसल्याचे माझ्या व माझ्या पत्निच्या लक्षात आल्याने मी इतरांनी आसेफ उर्फ लडू पठाण यांना त्यांचा मुलगा मानेखाँ असेफ पठाण यास समजावुन सागंण्या बाबत समजावून सांगितले होते त्या प्रमाणे मानेखाँ पठाण हा काही दिवस आमच्या घराकडे पाहत नसे किंवा घराच्या बाहेर चकराही मारत नसे त्यावेळी मी माझी मुलगी तुझे आणि मानेखाँ उर्फ दादा पठाण यांचे काय चालु आहे तेव्हा मला म्हणाली की, मानेखाँ मला म्हणतो की, तु मला आवडतेस आपण पळुन जावुन लग्न करू तेव्हा मी व माझ्या पत्नीने समजावून सांगितले होते.

दिनांक २ जुलै २०२७ रोजी सकाळी ८ वाजणेचे सुमारास माझा लहान मुलगा मी व माझा पत्नी नेहमी प्रमाणे सकाळी ९ वा. सुमारास कामावर गेलो होतो व माझी मुलगी ही घरीच होती मी व माझी पत्नी संध्याकाळी ६ वा. सुमारास घरी आलो तेव्हाआमच्या घरासमोर खेळत होता तेव्हा आम्ही कुठे गेली असे विचारले असता तो म्हाणाला की, शाळेतुन आलो तेव्हा घराचा दरवाजा पुढे केलेला होता. मी तेव्हा मला वाटले ही शेजारी गेली आसावी पण ती आत्तापर्यंत ही घरी आलेली नाही असे सांगितल्या नंतर व माझी पत्नी गल्लीत व नातेवाईकाकडे शोध घेतला तेव्हा ती मिळुन आली नाही पण आम्हाला वाटले की, येईल थोड्या वेळाने म्हणुन आम्ही घरीच थाबलो त्यानंतर दिनांक ३ जुलै रोजी सकाळी आमच्याच गल्लीतील आसेफ उर्फ लड्डू पठाण हा आमच्या घरी आला व म्हणाला की, तुमची मुलगी व माझा मुलगा मानेखाँ हे पुणे येथे पळून गेलेले आहेत आम्ही त्यांना बोलावुन घेतौत ते दोघेही उद्या १२ वाजे पर्यंत घरी येतील असे म्हणाल्यामुळे मी पोलीस स्टेशनला तक्रार दिली नाही

आज दिनांक ४ जुलै रोजी सकाळी ११ वा सुमारास मला असेफ पठाण यांचा फोन आला व ते मला म्हाणाले की, तुमची मुलगी व माझा मु अबांजोगाईत येत आहेत तुम्ही शिवाजी चौकात या तेव्हा मी माझ्या पत्नीसह शिवाजी चौकात गेलो तेव्हा तेथे असेफ पठाण चा मुलगा मानेखाँ पठाण व माझी मुलगी ही आले होते मी व माझ्या पत्नीने जवळ घेतले तेव्हा मानेखाँ असेफ पठाण तेथुन निघुन गेला
त्यांनंतर मी व माझ्या पत्नीने विचारले की, कोठे गेलीहोतीस तुझ्यात व मानेखाँयांच्या मध्ये काही शरीर संबंध आले की, तेव्हा आम्हला सांगितले की, मानेखाँ हा माझ्या सोबत लग्न करतो असे म्हणाला आहे.

त्यामुळे मी व मानेखाँ आम्ही दोघे पुण्याला त्याची मावशी हरझाना पठाण यांच्याकडे गेलो होतो. व आमच्या दोघा मध्ये पुण्याला जाताना ट्रॅव्हल्स मध्ये माझे व मानेखाँ याचे शरीर संबंध झालेले आहे. असे म्हणाल्या नंतर आम्ही सर्वजण मुलीला घेउन पोलीस स्टेशनला आलो व मानेखाँ उर्फ दादा आसेफ पठाण यांने माझी आल्पवयईन मुलगी हीस लग्नाचे आमीष दाखवुन पळवुन नेहुन तीच्यावर बलात्कार केला आहे. मानेखाँ उर्फ दादा आसेफ पठाण याचे विरुद्ध शहर पोलीसठाण्यात गुन्हा र.न.२८९/२२ कलम ३६३, ३७६ भादवीसह कलम ४ ,८ ,१२ पोक्सो नुसार गुन्हा दाखल केला असुन त्यास अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घोळवे हे करत आहेत.

Team Madyam

Madhyam Network / Madhyam News #माध्यम या मराठी चॅनलवर आपलं स्वागत.महाराष्ट्रासह राष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी अगदी सोप्या शब्दांत खास आपल्या साठी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker