महाराष्ट्र

मांजरा नदीच्या दुतर्फा १४ गावामध्ये १८ किमी मानवी साखळीतुन वृक्षलागवड

आपण नद्यांच्या काठावर झाडे का लावले पाहिजेत ?

लातूर / आपल्या देशात लातूर जिल्हा कमी पर्जन्यमान असलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. प्रत्येक जिल्ह्याचे सरासरी वन क्षेत्र हे ३३ टक्के एवढे असणे आवश्यक आहे. मात्र लातूरचे वनाच्छादित क्षेत्र हे 0.6% टक्के एवढे अत्यल्प आहे. हे वाढविण्यासाठी मांजरा नदी काठी दुतर्फा 14 गावांमध्ये 10 किलोमीटर मानवी साखळीच्या माध्यमातून 28 हजार वृक्ष लागवडीचा एक अभिनव प्रयोग लातूर जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी मा.बी.पी.पृथ्वीराज यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 24 जुलै 2022 रोजी ग्रामस्थांच्या सहकार्याने मोठ्या उत्साहात

या अभियानात महात्मा बसवेश्वरमहाविद्यालयातील संस्था पदाधिकारी, प्राचार्य, समन्वयक, विभाग प्रमुख, प्राध्यापक बंधू-भगिनी आणि विद्यार्थी विद्यार्थिनींनी उमरगा आणि बोकणगाव या दोन गावामध्ये मांजरा नदी काठ वृक्ष लागवड अभियानात सक्रीय व सकारात्मक सहभाग नोंदविला यासंबंधी त्यांनी बोकणगांव येथील कार्यक्रमांमध्ये महाविद्यालयाचे अभिनंदन करून गौरवोद्गार काढले. रोजगार हमी योजना शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर, महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, लातूर आणि ग्रामपंचायत कार्यालय, कोकणगाव आणि उमरगा यांच्या संयुक्त विद्यमाने मांजरा नदी काठ वृक्ष लागवड अभियान नुकतेच संपन्न झाले. या अभियानात महात्मा बसवेश्वरमहाविद्यालयाने एकूण ४३०० वृक्ष लागवड केली. सुरुवातीपासूनच या अभियानामध्ये महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाचा सहभाग हा महत्त्वाचा राहिला आहे. भविष्यातही आपण या अभियानाला लोक चळवळीचे स्वरूप आणण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असेही ते म्हणाले. यावेळी मा. पाशा पटेल, उपजिल्हाधिकारी नितीन वाघमारे, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, तहसीलदार स्वप्निल पवार, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, गटविकास अधिकारी तुकाराम भालके, सरपंच सुरेखा दयानंद स्वामी, उपसरपंच किशोर दाताळ, मुख्याध्यापक रमाकांत जाधव, ग्रामसेवक जयश्री तोडकर, युवा नेते सचिन दाताळ, अमृत दाताळ, डॉ. बी. एम. गोडबोले,डॉ. संजय गवई, संजीवकुमार सुवर्णकार, लिनेसच्या अध्यक्षा महानंदा रासुरे व सचिव सीमा गव्हाणे यांची प्रमुख उपस्थिती होती..

आपण नद्यांच्या काठावर झाडे का लावले पाहिजेत ?

तज्ज्ञांच्या मते, गेल्या दहा वर्षांत, नदीच्या जवळील झाडे फार कमी झाली आहेत. सध्या जगात वाहत्या नदी जवळील झाले संपुष्ठात आली आहेत. त्यात हजारो मूळ झाडे आणि झुडुपे लुप्त झाले आहेत जे पाण्याची शुद्धता आणू जलजीवानाला वाढवण्यास मदत करते.

रिव्हर बेसिन अर्थात नदी पात्रातील झाडे बफर पुनर्संचयित करण्यासाठी मदत करते, नदीच्या प्रवाहातून अनेक अशुद्धी फिल्टर करते, नदी किनाऱ्याजवळील जमिनीची धूप कमी करते, मासे, पाणपक्षी आणि इतर वन्यजीवांचे अधिवास सुधारण्यात मदत करते आणि माती आणि जलसंधारण सुधारण्यासाठी दीर्घकालीन फायदे करून देते. नवीन लागवड तंत्रांचा प्रयोग करून रिपेरियन बफर लागवड वाढवण्यासाठी, देखभाल करण्याच्या संधी यातून तयार होतील.

Team Madyam

Madhyam Network / Madhyam News #माध्यम या मराठी चॅनलवर आपलं स्वागत.महाराष्ट्रासह राष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी अगदी सोप्या शब्दांत खास आपल्या साठी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker