ठळक बातम्या

उस्मानाबाद मेडिकल कॉलेज चा प्रस्ताव केंद्रीय आयुर्विज्ञान आयोगाने नाकारला

The proposal of Osmanabad Medical College was rejected by the Central Commission for Medical Sciences

 

शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर एकापाठोपाठ महाविकास आघाडीच्या (mva gavoernment) निर्णयांना स्थगिती देण्याचा धडाका लावला. आता उस्मानाबादसाठी मंजूर केलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा (Government Medical College) प्रस्ताव केंद्रीय आयुर्विज्ञान आयोगाने (Central Commission for Medical Sciences) नाकारला आहे. त्यामुळे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हा धक्का मानला जात आहे.

महाविकास आघाडी सरकारने मोठा गाजावाजा करत उस्मानाबादसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव मंजूर केला होता. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिष्ठा चा प्रश्न बनवत हे महाविद्यालय उस्मानाबाद जिल्ह्यांसाठी मंजूर केले होते. औरंगाबाद इथं झालेल्या सभेत हा प्रस्ताव कसा मंजूर केला याबद्दल खासदार ओमराजे निंबाळकर यांचा हवाला देत कौतुकही उद्धव ठाकरे यांनी केलं होतं.


पण आता उद्धव ठाकरे यांच्या महत्वकांक्षी प्रकल्पाला केंद्र सरकारच्या आयुर्विज्ञान आयोगामार्फत खो देत धक्का दिला आहे. आयुर्विज्ञान आयोगाने हा प्रस्ताव फेटाळला आहे. त्यामुळे या वर्षी कोणतेही प्रवेश होणार नाही. आयुर्विज्ञान आयोगाने प्रस्ताव नाकारला असल्याने शासकीय महाविद्यालय पुन्हा एकदा रखडले आहे. कागदपत्रांची पूर्तता न केल्याने प्रस्ताव नाकारला आहे. त्यामुळे यावर्षी प्रवेश प्रक्रिया होणार नाहीत.

दरम्यान, राज्यात चांगल्या दर्जाचे शासकीय महाविद्यालय नसल्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात शासकीय महाविद्यालय उभारले जावे, यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी आरोग्य विभागाला आदेश दिले होते. त्यामुळे 16 जिल्ह्यांमध्ये शासकीय रुग्णालय उभारण्यात गी मिळेल. परभणी, उस्मानाबाद, मुंबई उपनगर आणि रत्नागिरी या ठिकाणी महाविद्यालय उभारण्यासाठी परवानगी मिळाली आहे. तर परभणी, उस्मानाबाद, रत्नागिरी या तीन ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याबाबतचा प्रस्ताव राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडे मंजुरीसाठी पाठवला होता. त्यापैकी उस्मानाबादचा प्रस्ताव नाकारला आहे.

याच वर्षी सुरु होईल! 

तर, मेडिकल कॉलेज याच वर्षी सुरू होईल त्यासाठी आवश्यक ती कागदपत्रांची पूर्तता करण्यात येईल अशी माहिती, भाजपचे आमदार राणा पाटील यांनी दिली आहे

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker