माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा सीबीआय कोठडीतील मुक्काम वाढला
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/07/anil-deshmukh.png)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/07/anil-deshmukh.png)
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Anil Deshmukh)यांनी भ्रष्टाचाराच्या प्रकरणात दाखल केलेला जामीन अर्ज विशेष सीबीआय न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे देशमुख यांचा सीबीआय कोठडीतला मुक्काम वाढला आहे. तसेच, देशमुखांचे सहकारी कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांचाही जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे.
सीबीआयने देशमुख आणि त्यांचे कथित सहकारी स्वीय सचिव संजीव पालांडे आणि स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे यांच्यावर आरोपपत्र दाखल केले असून बडतर्फ पोलीस अधिक्षक सचिन वाझेला माफीचा साक्षीदार करण्यात आले आहे. त्याप्रकरणात देशमुख यांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, न्यायालयाने अद्याप देशमुख यांना दिलासा दिला नाही.
दाखल केलेले आरोपपत्र केवळ 59 पानांचे असून आरोपपत्र अपूर्ण आहेत. तसेच ताब्यात घेतल्याच्या 60 दिवसांच्या आत चौकशी पूर्ण होणे आवश्यक आहे. तसेच तपास पूर्ण झाल्याशिवाय अपूर्ण आरोपपत्र दाखल करण्यात आल्यामुळे देशमुख जामीनासाठी पात्र असल्याचा दावाही देशमुखांनी याचिकेतून केला होता.माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे गेल्या आठ महिन्यापेक्षा जास्त काळापासून कोठडीत असून त्यांचा मुक्काम आणखी वाढण्याची शक्यता आहे.
‘ईडी’कडून पैशांच्या गैरव्यवहाराचा तपास सुरू असतानाच सीबीआयला मूळ १०० कोटी रुपयांच्या खंडणी वसुलीच्या आरोपाचा तपास करायचा आहे. यासाठी सीबीआयला अनिल देशमुख यांचा ताबा हवा होता. विशेष पीएमएलए न्यायालयाने सीबीआयला तशी परवानगी दिली होती. त्यानुसार आज सीबीआयने अनिल देशमुख यांचा अधिकृतपणे ताबा घेतला आहे. ताबा देण्याच्या सीबीआय कोर्टाच्या आदेशाला आव्हान देणारी याचिकाही देशमुख यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केली होती. अनिल देशमुख यांना थोड्याच वेळात सेशन्स कोर्टात विशेष सीबीआय कोर्टात हजर केले जाण्याची शक्यता आहे. अनिल देशमुख यांना कालच जे.जे रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यानंतर लगेचच सीबीआयने अनिल देशमुख यांचा ताबा घेतला आहे. ऑर्थर रोड तुरुंगातून सीबीआयने ताबा घेतला आहे.