Team
सुदर्शन रापतवार हे महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकारापैकी एक नाव. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई सारख्या सुसंस्कृत गावातून त्यांनी आपली सुरुवात केली, आणि ती जोपासली आणि खुलवलीही. मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. सकारात्मक, समाजभान ठेवूनच पत्रकारीता करायची अशी खूणगाठ बांधून त्यांनी आपल्या पत्रकारीतेला १९८५ च्या सुमारास सुरुवात केली. त्यांच्या समृध्द पत्रकारितेची 41वर्ष !
आता डिजिटल स्वरूपात माध्यम या वेब पोर्टल च्या माध्यमातून आम्ही आपल्या समोर घेवून येत आहोत.