ठळक बातम्यामहाराष्ट्र

Viral call: “ज्यानं घात केला त्याच्यासोबतही घातच होईन”; वारकरी महिलेची रेकॉर्डींग

शिवसेनेचे विधानपरिषदेचे आमदार आंबादास दानवे यांच्या फेसबूक वॉलवर ही रेकॉर्डींग शेअर करण्यात आलेली आहे.

आषाढी एकादशी हा महाराष्ट्राचा वर्षातून एकदा येणारा मोठा सण असतो. यासाठी राज्यभरातून अन् राज्याच्या बाहेरून सुद्धा लाखो वारकरी पंढरपुरात (Pandharpur) येत असतात. दोन वर्ष कोरोना काळामुळे वारी बंद असल्यानं वारकऱ्यांना विठुरायाचं दर्शन घेता आलं नव्हतं. त्यानंतर आता दोन वर्षांनी लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी वारकऱ्यांनी पंढरपुरात गर्दी केली होती. तर दुसरीकडे राज्यात सुरु असलेल्या सत्तासंघर्षानंतर मुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे देखील पंढरपुरात आलेले होते. यावेळी एकनाथ शिंदेंच्या (CM Eknath Shinde) ताफ्यामुळे वारकऱ्यांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागल्याचं एका वारीला गेलेल्या महिलेच्या बोलण्यातून दिसून आलं.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या सत्तासंघर्षात राज्याने ऐतिहासिक बंड आणि त्यानंतर निर्माण झालेली परिस्थिती पाहिली. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे तब्बल ४० आमदार घेऊन भाजपसोबत जात सत्तास्थापन केली. त्यानंतर मात्र आता शिवसेना आणि शिंदे गटामध्ये मोठा संघर्ष सुरु आहे. दोन्ही बाजुंनी एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. अशातच उद्धव ठाकरे यांचे खंदे समर्थक मानले जाणारे विधानपरिषदेचे आमदार आंबादास दानवे यांनी एक ऑडिओ क्लिप आपल्या फेसबूकवर शेअर केली आहे. यामध्ये पंढरपुरला गेलेली वारकरी महिला आपल्या कुटुंबासोबत फोनवर बोलत असल्याचं दिसतंय. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल या महिलेनं केलेलं वक्तव्य आणि ही संपूर्ण कॉल रेकॉर्डींग सध्या व्हायरल होताना दिसतेय

https://www.facebook.com/watch/?v=1509093582879584

सामान्य माऊलीची प्रतिक्रिया…

दरम्यान, या ऑडिओ रेकॉर्डींगमध्ये या महिलेनं सांगितलं की, पंढरपुरात सध्या प्रचंड गर्दी आहे. आम्ही गेलो तेव्हा मंत्र्याची पुजा सुरु होती. त्यावेळी सर्व लोक म्हणत होते की, गद्दाराला काय पाहायचं. गरीब लोकं रोडवर राहतात आणि यांना काय होणार असं म्हणत या माऊलींनी ज्यानं घात केला त्याच्यासोबत घात होईल असं म्हटलं आहे.

Team Madyam

Madhyam Network / Madhyam News #माध्यम या मराठी चॅनलवर आपलं स्वागत.महाराष्ट्रासह राष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी अगदी सोप्या शब्दांत खास आपल्या साठी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button