महाराष्ट्र

बीडच्या अविनाश साबळे यांनी पटकाविले स्टीपलचेस मध्ये रौप्यपदक

नवी दिल्ली – बीड जिल्ह्याचा सुपुत्र अविनाश साबळे याने स्टीपलचेस या क्रीडा प्रकारात रौप्यपदक जिंकले आहे. कॉमनवेल्थ गेम्स मध्ये अविनाश ने ही कामगिरी केल्याने बीड जिल्ह्यात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. अविनाश साबळेने पुरुषांच्या 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये रौप्य पदक जिंकले. अविनाशने 8.11.20 मिनिटांत आपली शर्यत पूर्ण केली. यासह त्याने तीन हजार मीटर शर्यतीत नवा राष्ट्रीय विक्रम सुवर्णपदक विजेता अब्राहम किबिव्होटपेक्षा अविनाश फक्त 0.5 सेकंद मागे होता. केनिया अब्राहमने 8.11.15 मिनिटांत आपली शर्यत पूर्ण केली. त्याचवेळी केनियाच्या आमोस सेरेमने 8.16.83 मिनिटांत आपली शर्यत पूर्ण करून कांस्यपदक पटकावले.

अविनाशने याआधी देखील अनेक वेळा चमकदार कामगिरी केली आहे. पण यावेळची कॉमनवेल्थ स्पर्धा त्याच्यासाठी खूप खास होती. अविनाशने आपली सर्वोत्तम कामगिरी करत 8 मिनिटे 11.20 सेकंद घेत शर्यत जिंकली. या स्पर्धेत रौप्यपदक जिंकणारा अविनाश हा पहिला भारतीय खेळाडू ठरला असून सर्वच स्तरातून त्याचे कौतूक होत आहे.

बीडच्या शेतकरी पुत्राने राष्ट्रकुल स्पर्धेत (Commonwealth Games 2022) कमाल केली आहे. 3 हजार मीटर स्टीपलचेस स्पर्धेत भारताला नवीन राष्ट्रीय विक्रमासह रौप्य पदक मिळवून दिले आहे. अविनाश साबळेने (Avinash Sable) राष्ट्रीय विक्रम मोडत 8:11.20 अशी वेळ घेत पदक जिंकले. महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील अविनाशने वैयक्तिक सर्वोत्कृष्ट तसेच राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. हलाखीच्या परिस्थितीतून मुलानं मोठ्या जिद्दीने हे नाव कमावले. आज मोठा आनंद झाल्याचं अविनाशचे वडील मुकुंद साबळे यांनी सांगितले.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button