महाराष्ट्र

मेजर केशवराव भोसले यांचे निधन; अंबाजोगाई परिसरात हळहळ

भारतीय सैन्य दलाच्या सेवेतुन मेजर म्हणून निवृत्त झालेले ज्येष्ठ माजी सैनिक मेजर केशवराव आप्पाराव भोसले यांचे नुकतेच निधन झाले.
मेजर केशवराव भोसले यांनी भारतीय भु दलात शिपाई म्हणून प्रवेश मिळवला व आपल्या योग्य व परीश्रमपुर्वक नौकरीत त्यांनी मेजर या पदापर्यंत झेप घेतली.
सेवानिवृत्ती नंतर मेजर केशवराव भोसले यांनी आपली पारंपरिक शेती व्यवसाय करीत शहरातील सामाजिक व राजकीय कार्यक्रमात ते हिरहिरीने सहभाग घेत असत. प्रतिवर्षी सार्वजनिक रित्या साज-या होणा-या भारतीय स्वातंत्र्य, प्रजासत्ताक दीन, महाराष्ट्र दिनी आणि मराठवाडा मुक्ती संग्रामानिमित्त आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमात ते आपल्या छातीवर सैन्यदलातील उत्कृष्ट कार्यातील सन्मानाबध्दल मिळालेली सन्मानचिन्ह लावून आवर्जून येत असत. आपण भारतीय सैन्य दलात काम केले याचा अभिमान त्यांच्या नसानसात ठासून भरलेला असे.

सेवानिवृत्ती नंतर ही भारतीय सैन्यदलातील अनेक निवृत्त अधिका-यांशी त्यांनी सौहार्दाचे संबंध जोपासले होते. अंबाजोगाई शहराजवळ आणि शहरात असलेली फौज निगराती या शिर्षकाखालील जमीन केंद्रशासनाच्या सैन्यदलाच्या प्रॉजेक्ट उभारणीसाठीच मिळायला पाहिजे यासाठी ते फार आग्रही असायचे. याशिवाय शहरातील माजी सैनिकांच्या मुलांसाठीचे वसतिगृह, त्रिदली माजी सैनिक सहकारी पतसंस्था व सामाजिक संस्थाशी त्यांचा निकटचा संबंध होता.

मेजर केशवराव भोसले हे सात एक वर्षापूर्वी झालेल्या आपल्या पत्नीच्या निधनानंतर पुर्णतः खचले होते. मध्यंतरी त्यांना अर्धांगवायूचा आजार ही झाला होता. अत्यंत धष्टपुष्ट शरीरयष्टी आणि जन्मजात इतरांना मदत करण्याचा त्यांना लाभलेला स्वभाव यामुळे ते अंबाजोगाई शहर आणि परिसरात सर्वपरीचित असे व्यक्तिमत्व होते.
“आजादी का अमृत महोत्सव” या उपक्रमांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येक नागरिकांना आपल्या घरावर १३ ऑगस्ट रोजी तिरंगा फडकावण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत आमच्या मॉर्निंग ग्रुप च्या वतीने व सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर वडमारे यांच्या पुढाकाराने त्यांच्यानिवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या सार्वजनिक ध्वजारोहण कार्यक्रमात मेजर केशवराव भोसले आणि ज्येष्ठ माजी सैनिकांची भेट झाली होती. या कार्यक्रमात मेजर भोसले यांच्याशी भरपुर गप्पा मारल्या होत्या. सर्व माजी सैनिकांनी आणि उपस्थितांनी या कार्यक्रमाची प्रशंसा केली ही होती.

मेजर केशवराव भोसले यांचा माझ्याशी प्रचंड स्नेह होता. भारतीय सैन्य दलात असतांना भारत चीन आणि कारगील युध्दातील अनेक आठवणी ते माझ्याशी शेअर करीत असत.
मेजर केशवराव भोसले यांच्या अकाली निधनाने माझे वैयक्तिक व शहराचे ही मोठे नुकसान झाले आहे. मेजर भोसले यांच्या निधनामुळे शहर व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात तीन मुली, जावाई, नातवंडं आदि परीवार आहे.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button