महाराष्ट्र

अंबाजोगाईचे स्वाराती वैद्यकीय महाविद्यालय पुन्हा राज्यात अव्वल; गोल्डन रॅंक मध्ये समावेश


महाराष्ट्रातील विविध शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या योजनांची उत्कृष्ट आणि सर्वोत्तम अंमलबजावणी करण्यात आल्याबद्दल महाराष्ट्र राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी संचनालयाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या जुन महिन्याच्या गोल्डन रॅंकींग मध्ये अंबाजोगाईचे स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय हे एकमेव सर्वप्रथम आले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या वतीने राज्यातील १९ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामकाजाचा अहवाल प्रत्येक महिन्यात मागवण्यात येतो. या अहवालावरून वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे सचीव, कमिशनर, संचालक आणि इतर नियुक्त सदस्य राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयाच्या गोल्डन, सिल्व्हर आणि ब्राॉंझ रॅंकींग ठरवतात. या कॅटॅगिरी मधील जुन महिन्याच्या गोल्डन रॅंकींग मधील गोल्डन कॅटॅगिरी मध्ये अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय हे एकमेव आले आहे.
वैद्यकीय शिक्षण व संचालनालयाच्या वतीने ठरवण्यात आलेल्या रॅंकींग ची कॅटॅगिरी खालील प्रमाणे आहे.

गोल्डन रॅंक

स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय, अंबाजोगाई ७७

सिल्व्हर रॅंक

  • शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
    नागपुर ५७
  • डॉ. वैशंपायन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर ५५
  • शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
    लातूर ४७
  • जे.जे.शासकीय वैद्यकीय
    महाविद्यालय, मुंबई ४५
  • शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला ३९.३
  • शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
    नांदेड ४४
  • शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
    औरंगाबाद ४३
  • शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,
    अकोला ४३
  • शासकीय वैद्यकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव ४३
  • शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
    सिंधुदुर्ग ४३
    *शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
    कोल्हापूर ४२
  • शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,
    बारामती ४०
  • शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
    नांदेड ४०
  • बी. जे. मेडिकल कॉलेज पुणे ३९

ब्रॉंझ रॅंक

  • शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
    चंद्रपुर ३४
  • शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
    सातारा ३४
  • शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
    धुळे ३२
  • शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
    गोंदिया ३१
  • शासकीय वैद्यकीय महाविद्यालय.
    नागपुर २३
  • शासकीय वैद्यकीय महाविद्यालय.
    नंदुरबार २३
  • शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
    यवतमाळ १९

अधिष्ठाता डॉ भास्कर खैरे यांचे अभिनंदन!

▪️अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांचे अनेकांनी केले अभिनंदन आहे. महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व संचनालयाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या रॅंकींग मध्ये अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाने प्रथम क्रमांक मिळविल्याबध्दल अधिष्ठाता डॉ.भास्कर खैरे व त्यांच्या सर्व टीमचे शहरातील अनेक नागरिकांनी अभिनंदन केले आहे.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button