Uncategorized
आता शासकीय जमिनीवरील वसाहतींचे अतिक्रमणे निष्काशीत करण्याचे आदेश
राज्य शासनाने २३ जानेवारी २०२५ ला काढले नवे आदेश!
अंबाजोगाई येथील शासकीय अद्दापक महाविद्यालय परिसरातील (बी एड कॉलेज) परिसरात माजी सैनिकांनी केलेल्या अतिक्रमणा सह सर्वच शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे काढण्याचे राज्य शासनाचे आदेश आले असल्याने शहरातील बहुतांशी शासकीय जागा या सार्वजनिक बांधकाम विभाग ताब्यात घेवून त्या ठिकाणची अतिक्रमणे काढली जाणार आहेत तसे आदेश राज्य सरकारचे असून शहारातील सर्व शासकीय जागांवरील अतिक्रमण धारकांनी अतिक्रमण निष्काशीत करावे अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने पोलिस बंदोबस्तात ही अतिक्रमणे काढली जाणार असून नवीन अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागो कार्यकारी अभियंता गौरीशंकर स्वामी यांनी दिली आहे.
जानेवारी मध्ये निघाला नवा आदेश!
अंबाजोगाई शहरातील बहुतांशी वस्त्या आणि गल्ल्या या शासकीय जागांवर अतिक्रमण करुन वसलेल्या आहेत. ज्यामध्ये सदर बाजार भागातील फ्लॉवर्स क्वार्टर, सब जेल सदर बाजार, अभियांत्रिकी महाविद्यालयासमोरील वसलेली माजी सैनिकांची वसाहत, यशवंतराव चव्हाण चौक परिसरातील दुध डेअरी बाजूची वस्ती अशा इतर जागांचा यात समावेश आहे. राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने शहरातील शासकीय जागेवरील आणि विशेषत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले असून हे अतिक्रमण तात्काळ निष्काशीत करुन सर्व शासकीय जागा ताब्यात घेण्यात याव्यात असा शासन आदेश दि. 23 जानेवारी 2025 रोजी निर्गमित झालेला असून त्याचा शासन निर्णय क्रमांक हा सां. ब.ज -2024 /प्र.क्र. 179 / मिव्य 1 असा आहे.
उपसचिव निरंजन तेलंग यांनी काढले आदेश
त्यानुषंगाने सदरील शासन निर्णयात स्पष्ट केले आहे की सार्वजनिक बांधकाम विभागांच्या जागावर अतिक्रमण होणार नाही याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे तसेच सार्वनिक बांधकाम विभागाच्या भुखंडावरील / जमीनीवरील अस्तित्वातील अतिक्रमणे तात्काळ निष्काशीत करण्यात यावीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेची खाजगी व्यक्ती / संस्था / महामंडळे तसेच शासनाचे इतर विभागाकडून कोणत्याही कारणास्तव मागणी प्राप्त झाल्यास सदर जागा उपलब्ध करुन देणे आवश्यक असल्यास त्यास शासन मान्यता घेणे आवश्यक राहील यापुढे शासनाची पूर्व परवानगी घेतल्याशिवाय कोणालाही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आख्यारितील जमीनीचे हस्तांतरण अथवा भाड्याने दिल्याचे आढळल्यास संबंधीतीविरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल असा आदेश महाराष्ट्र शासनाचे उपसचिव निरंजन तेलंग यांनी दिला आहे.



