बीडमहाराष्ट्र

पहिला जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा झाला ?

बीड शहरातील सरस्वती विद्या मंदिर शाळेत जागतिक लोकसंख्या दिन साजरा झाला

वाढत्या लोकसंख्येविषयी लोकांना जागरूक करण्यासाठी जागतिक लोकसंख्या दिन दरवर्षी 11 जुलै रोजी साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश असा आहे की, जगातील प्रत्येक व्यक्तीने वाढत्या लोकसंख्येकडे लक्ष दिले पाहिजे आणि लोकसंख्या थांबविणयात आपली भूमिका निभावली पाहिजे.

वाढत्या लोकसंख्येने जगातील बऱ्याच देशांसमोर मोठ्या समस्येचे रूप धारण केले आहे. त्याचा सर्वात जास्त तोटा विकसनशील देशांना होत आहे. लोकसंख्या स्फोट ही एक गंभीर चिंता आहे. या दिवशी लोकांना कौटुंबिक नियोजन, लिंग समानता, मानवी हक्क आणि महिला आरोग्य याबद्दल माहिती दिली जाते. (World Population Day History)

पहिला जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा झाला? (First World Population Day)

11 जुलै, 1987 रोजी जागतिक लोकसंख्या सुमारे 5 अब्ज बनली होती. त्यामुळे लोकसंख्येची वाढ हा सार्वजनिक स्तरावरील सर्वाधिक स्वारस्यपूर्ण विषय बनला होता. या स्वारस्यात दिवसेंदिवस वाढ होत राहिल्यामुळे लोकसंख्यावाढीच्या संदर्भात अनेक कार्यक्रम राबविण्यात येऊ लागले. सन 1989 मध्ये ‘संयुक्त राष्ट्रसंघाच्या विकासविषयक कार्यक्रमा’च्या (UNDP) गव्हर्निंग कौन्सिलने 11 जुलै हा दिवस ‘जागतिक लोकसंख्या दिन’ म्हणून जगभर साजरा केला जावा, अशी शिफारस केली. या शिफारशीनुसार, सन 1989 पासून 11 जुलै हा दिवस ‘जागतिक लोकसंख्या दिन’ म्हणून साजरा केला जातो.

सरस्वती विद्या मंदिर शाळेत जागतिक लोकसंख्या दिन साजरा झाला

बीड  शहरातील सरस्वती विद्या मंदिर शाळेत जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रमाचे आयोजक करण्यात आले . यावेळी बोलताना प्रशांत पवार म्हणाले की , प्रचंड प्रमाणात वाढत जाणारी लोकसंख्या ही विकासातील गतीरोधक नव्हे तर फार मोठा अडशळा आहे . झपाट्याने वाढत  जाणाऱ्या लोकसंख्येमुळे प्रत्येक नागरिकाला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात अनेक अडचणी निर्माण होत आहेत .

पुढे बोलताना श्री पवार म्हणाले की , ‘ छोटे कुटुंब सुखी कुटुंब ‘ या संकल्पनेतून प्रत्येक  कुटुंबाला ‌मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्यावयाच्या असतील तर लोकसंख्या वाढीवरील उपाययोजनांची जनजागृती करून नियोजनबद्ध आणि कृतिबद्ध कार्यक्रमांची अंमलबजावणी केली पाहिजे , विद्यार्थ्यांच्या मनामध्ये छोटे कुटुंब सुखी कुटुंब ही संकल्पना रुजली  गेल्यास  येणाऱ्या भविष्य काळात भारतासारख्या विकसनशिल देशात लोकसंख्या नियंत्रणात आणून प्रत्येक व्यक्तीला मुलभूत गरजांची उपलब्धता करून देणे सहज शक्य होईल . लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी शासनाने  सुरु केलेल्या योजनांची जनतेकडून अंमलबजावणी होणे आवश्यक आहे असेही श्री प्रशांत पवार म्हणाले . शाळेच्या  प्रांगणात पार पडलेल्या या कार्यक्रमास डॉ . नंदकुमार उघाडे यांच्यासह सर्व शिक्षकवृंद व काही विद्यार्थ्यांचे पालकही उपस्थित होते.

Team Madyam

Madhyam Network / Madhyam News #माध्यम या मराठी चॅनलवर आपलं स्वागत.महाराष्ट्रासह राष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी अगदी सोप्या शब्दांत खास आपल्या साठी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button