महाराष्ट्र

डॉ. सिध्देश्वर बिराजदार आणि डॉ. सौ. सुनिता बिराजदार यांची बदली

स्टे मुळे बदली झाल्याची चर्चा!

स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाचे मेडिसीन विभाग प्रमुख डॉ. सिध्देश्वर बिराजदार आणि फिजिऑलॉजी विभागप्रमुख डॉ. सौ. सुनिता बिराजदार यांची अंबाजोगाई येथुन बदली करण्यात आल्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या संचनालयाच्या वतीने करण्यात आल्या आहेत.


महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या संचनालयाच्या वतीने १० ऑगस्ट रोजी सदरील आदेश काढण्यात आले आहेत. डॉ. सिध्देश्वर बिराजदार यांची औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर नांदेड येथील शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे विभाग प्रमुख डॉ. धोंडिबा भुरके यांची बदली करण्यात आली आहे.


डॉ. सौ. सुनिता हंडरगुळे (बिराजदार) यांची बदली विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ. शैलेश भावे यांची बदली करण्यात आली आहे.
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग संचनालयाच्या वतीने करण्यात आलेल्या या आदेशावर अव्वल सचीव मनोहर बंदपट्टे यांची स्वाक्षरी आहे.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button