इंजि. सौ. शैलजा चौधरी यांचे निधन

अंबाजोगाई येथील भारतीय दुर संचार कार्यालयात गेली अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या व नुकत्याच स्वेच्छा निवृत्ती स्विकारलेल्या उप अभियंता इंजि. सौ. शैलजा चौधरी (देशपांडे) यांचे आज १३ ऑक्टोबर रोजी दुपारी सातारा येथे -हदयविकाराने निधन झाले.
सौ. शैलजा चौधरी या आपले पती खोलेश्वर महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्रा. अजय चौधरी यांच्या समवेत सातारा येथील सुप्रसिद्ध असलेल्या प्रकृती हेल्थ रिसॉर्ट येथे प्रतिवर्षाप्रमाणे पंचकर्माचा उपचार करण्यासाठी गेल्या होत्या. या उपचारासाठी त्या सातारा येथे मुक्कामी असतांनाच दुपारी त्यांना तीव्र -हदयविकाराचा झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली.
सौ. शैलजा चौधरी देशपांडे यांच्या पश्चात पती प्रा.अजय चौधरी दोन मुले व इतर परीवार आहे. एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून सौ. शैलजा चौधरी या परीचित होत्या. त्यांच्या आकस्मिक निधनाबद्दल शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सौ. शैलजा चौधरी यांच्या पार्थिवावर आज १४ ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता दासोपंत मंदीर परिसरातील स्मशानभूमीवर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांचे नातेवाईकांनी दिली.



