महाराष्ट्र

ग्राम ऊर्जा च्या सीताफळ प्रक्रिया युनिट ला जिल्हाधिकारी यांची भेट

ग्राम ऊर्जा फाउंडेशन मागील ५ वर्षे पासून ऊस तोड आणि स्थलांतर या विषयावर काम करीत आहे. संस्थेच्या शाश्वत रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत “सृजन फार्मर प्रोड्युसर कंपनी” या महिला बहुल शेतकरी उत्पादक कंपनीचा सीताफळ प्रक्रिया युनिट एक आदर्शवत प्रकल्प आहे. मा. जिल्हाधिकारी साहेब श्री. विवेक जॉन्सन, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जितीन रहमान, यांनी काल सदरहू प्रकल्पाला भेट दिली. त्यांचे सोबत उपविभागीय अधिकारी श्री. दीपक वंजाळे, तहसीलदार श्री. विलास तरंगे, अप्पर जिल्हाधिकारी साहेब सौ. अश्विनी सोनवणे-जिरंगे तसेच ईतर जिल्हा व तालुका प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी साहेब यांनी प्रकल्पात प्रत्यक्ष काम करणाऱ्या व सृजन च्या संचालक तसेच भागधारक असणाऱ्या महिलांशी हितगुज करत प्रकल्पाची सविस्तर माहिती जाणून घेतली. सृजन कंपनीच्या माध्यमातून ऊसतोड कामगार असलेल्या सुमारे ३५० महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला असून, चालू वर्षात सुमारे ७ टन सीताफळ पल्प तयार करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी साहेबांना देण्यात आली.

जिल्हाधिकारी साहेब यांनी सृजन कंपनीत कार्यरत महिलांशी थेट संवाद साधत त्यांच्या अनुभवांबाबत चर्चा केली. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाचे जिल्हाधिकारी साहेब व इतर उपस्थित अधिकाऱ्यांनी विशेष कौतुक केले. तसेच या प्रकल्पासाठी प्रशासनाच्या वतीने आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी साहेब यांनी दिले.

हा प्रकल्प ग्रामऊर्जा फाउंडेशनच्या संकल्पना व मार्गदर्शनातून उभा राहिला असून सेवा इंटरनॅशनल, प्राज फाउंडेशन, सेल्को व युथऐड फाउंडेशन यांच्या सहकार्याने साकार झाला आहे. या प्रकल्पाला उमेद अभियान, कृषी विज्ञान केंद्र दिघोळ आदी सहयोगी व मार्गदर्शक संस्था जोडल्या आहेत. पुढील काळात सीताफळासोबतच इतर फळांच्या प्रक्रिया प्रकल्पांवर काम करून या महिलांना वर्षभर रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सृजन फार्मर प्रोड्युसर कंपनी व ग्रामऊर्जा फाउंडेशन प्रयत्नशील असल्याचे जिल्हाधिकारी साहेबांना सांगण्यात आले.

या प्रसंगी ग्रामऊर्जा फाउंडेशन तसेच सृजन फार्मर प्रोड्युसर कंपनीची कार्यकर्ता मंडळी उपस्थित होती.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button