संकल्प विद्यामंदिरात विद्यार्थ्यांनी साजरी केली इकोफ्रेंडली दिपावली
प्रकाशाचा उत्साह असलेला सण म्हणजे दीपोत्सव. सगळीकडे दिवाळीच्या तयारीला सुरुवात झाली आहे. याचाच एक भाग म्हणून संकल्प विद्यामंदिर येथील विद्यार्थ्यांनी आगळीवेगळी दिवाळी साजरी केली.
विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने आकर्षक आशा दीप उत्सवासाठी लागणाऱ्या पणत्या तयार केल्या. तर इयत्ता सहावी ते नववी च्या विद्यार्थ्यांनी इको फ्रेंडली आकाश कंदील तयार केले.
दिपावली निमित्ताने घेण्यात आलेल्या ऍक्टिव्हिटी मध्ये प्रथम व द्वितीय विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी दीपोत्सवामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेऊन शाळेचे वातावरण अगदी दीपावली मय केले होते.
आपल्या जीवनामध्ये पर्यावरणाला खूप महत्त्व आहे त्यामुळे पर्यावरणाची हानी होईल असे फटाके आपण वाजु नये. असा मौलिक संदेश शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती बडे आर.एस.यांनी दिला.
दीपोत्सव साजरा करण्यासाठी सांस्कृतिक विभाग तसेच सर्व शिक्षक वृंद विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.

