Uncategorizedमहाराष्ट्र
“वंचित”च्या उमेदवारांच्या तोंडाला काळे फासून चाबकाने मारहाण करणाऱ्या ५ पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

पाच पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
पक्ष श्रेष्ठींशी चर्चा न करताच भाजपाच्या उमेदवाराला पाठिंबा देणारे वंचित आघाडीचे उमेदवार सचीन चव्हाण याच्या तोंडाला काळे फासून चाबकाने फटके मारणा-या वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे, तालुकाध्यक्ष गोविंद मस्के व त्यांच्या इतर ३ सहका-यांविरुध्द पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हे दाखल करुन गजाआड केले आहे.
शहर पोलीसांनी दाखल केला गुन्हा
या संदर्भात अंबाजोगाई शहर पोलिस स्टेशन गोपनीय शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष बदने यांनी वरील पाच जणांविरुद्ध रितसर फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. संतोष बंधने यांनी दिलेल्या फिर्यादीत पुढे असे म्हटले आहे की, केज विधान सभा मतदार संघाचे वंचित बहुजन आघाडीचे पुरस्कृत उमेदवार सचिन भिमराव चव्हाण रा. बोधीघाट अंबाजोगाई यांचे प्रचार कार्यालय रमाबाई चौक येथे आहे. सदर कार्यालयामध्ये दिनांक १६/११/२०२४ रोजी १३:३० वाजणेच्या पुर्वी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष शैलेश कांबळे, त्यांचे सोबत असलेले गोविंद मस्के रा. अंबाजोगाई व इतर ८-९ इसमानी वंचित बहुजन आघाडी पुरस्कृत उमेदवार सचिन भिमराव चव्हाण रा. बोधीघाट अंबाजोगाई यांनी भाजपा पक्षाशी हातमिळवणी केली म्हणुन त्यांचे तोंडाला काळे फासुन त्यांना चापटाने व वायरने मारहाण केल्याचा व्हिडीओ फेसबुकवर व्हायरल झालेला पाहण्यास मिळाला.



