५२ बोगस दिव्यांग शिक्षकांवर निलंबनाची कारवाई

सीईओ अजित पवार यांची माहिती
स्वतःसह कुटुंबातील सदस्य कर्णबधीर, अल्पदृष्टी, अस्थिव्यंग यासह गंभीर आजारी असल्याचे प्रमाणपत्र दाखल करून बदलीसाठी अनेक शिक्षकांनी प्रयत्न केला होता, दाखल केलेले प्रमाणपत्र हे बोगस असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांच्या निदर्शनास आल्यानंतर संशयित शिक्षकांची अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालय मध्ये पुनर्रतपासणी करण्यात आली. यामध्ये तब्बल 52 शिक्षक हे बोगस आढळून आले होते. त्यानंतर या शिक्षकांची सुनावणी घेऊन सोमवारी (दि.23) तडकाफडकी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

बीड जिल्हा परीषदेतील सन 2022 प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाइन प्रणालीद्वारे जिल्ह्यांतर्गत बदली संदर्भात संशयास्पद दिव्यांग प्रमाणपत्र जोडल्याचा संशय व तक्रारीनंतर मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी बोगस दिव्यांनी प्रमाणपत्र जोडल्याचा संशय असलेल्या 336 शिक्षकांची सुनावणी घेतली. त्यापैकी 236 शिक्षकांची अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात पुनर्रतपासणी करण्यात आली. यामध्ये तब्बल 52दिव्यांग शिक्षकांनी बोगस प्रमाणपत्र जोडल्याचे आढळून आले. या 52 शिक्षकांवर सोमवारी तडकाफडकी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
▪️विभागीय कारवाई होणार
निलंबित केलेल्या 52 दिव्यांग बोगस शिक्षकांची विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली आहे. या चौकशीनंतर या शिक्षकांवर बडतर्फची कारवाई होऊ शकते.
88 शिक्षकांचा अहवाल प्रतिक्षेत!
अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात पुर्नतपासणी साठी पाठवलेल्या 336 पैकी 248 शिक्षकांचा अहवाल प्राप्त झालेला आहे. त्यात 52 बोगस दिव्यांग शिक्षक आढळून आले. या 52 शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्या नंतर आता उर्वरित 88 दिव्यांग शिक्षकांच्या दिव्यांनी प्रमाणपत्राचा अहवाल येणे बाकी असून यामध्ये किती बोगस प्रमाणपत्र आढळून येतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
