Uncategorized

डॉ. अशोक थोरात यांची सहाय्यक संचालकपदी नियुक्ती !

नाशिक जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अशोक थोरात यांना राज्याचे आरोग्य विभागात सहायक संचालक म्हणून पदोन्नती मिळाली आहे. सहायक संचालक एसटीडी एड्स मुंबई येथे त्यांची बदली झाली आहे तर त्यांच्या जागी डॉ चारुदत्त शिंदे यांची नियुक्ती झाली आहे.

बीड येथे जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून नाव मिळवलेले आणि सध्या नाशिक जिल्हा रुग्णालयात असलेले डॉ अशोक थोरात यांची सहायक संचालक म्हणून पदोन्नती झाली आहे. त्यांच्या पदोन्नती आणि बदलीचे आदेश 25 ऑक्टोबर रोजी शासनाने काढले आहेत. सदरील पदोन्नतीच्या आदेशानंतर डॉ. अशोक थोरात यांचे सोलापुर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, मेडिसीन विभाग प्रमुख डॉ. सिध्देश्वर बिराजदार, माध्यम डिजिटल न्युज नेटवर्क चे संपादक सुदर्शन रापतवार व इतरांनी अभिनंदन केले आहे.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button