Uncategorized
विनोद रापतवार यांना आदर्श बंधू भरत पुरस्कार जाहीर

कर्मयोगी डॉ. बालासाहेब ठोंबरे-पाटील स्मृती प्रतिष्ठानचा पुरस्कार
अंबाजोगाईचे भुमी पुत्र तथा नागपुर चे जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांना कर्मयोगी डॉ. बालासाहेब ठोंबरे-पाटील स्मृती प्रतिष्ठानचा आदर्श बंधू भरत पुरस्कार जाहीर झाला आहे.
केज तालुक्यातील ऊंदरी येथील कर्मयोगी डॉ. बालासाहेब ठोंबरे पाटील प्रतिष्ठान च्या वतीने यासंदर्भात विनोद रापतवार यांना दिलेल्या पत्रात पुढे असे म्हटले आहे की, आजच्या या व्यवहारी, स्वार्थी आणि अलिप्ततावादी समाजात आपण कौटुंबिक आदर्श मूल्यांची जपणूक करत, नातेसंबंधातील जिव्हाळा, आपुलकी, प्रेम, माया, ममता इ. भावनिक मूल्ये संवर्धित करून मानवी समाजामध्ये आदर्श निर्माण केला आहे.

ग्रंथात वर्णन केल्याप्रमाणे भरतासारखे आदर्श बंधूप्रेम आपल्या ठायी वसलेले आहे. हा बंधूभाव दूराप्रस्थ होत जाणाऱ्या या काळात आपला आदर्श अनुकरणीय आहे. आपण बंधूप्रेम, कौटुंबिक संस्कार व सार्वजनिक हिताचे कार्य केले असून माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात दीपस्तंभ म्हणून कार्यरत आहात. त्याकरीता कर्मयोगी डॉ. बालासाहेब ठोंबरे-पाटील स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने सन २०२४ चा आदर्श बंधू भरत पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देऊन आपणांस गौरविण्यात येत आहे.
