महाराष्ट्र

चार वर्षांत वाचवले हजारो रुग्णांचे प्राण

चार वर्षांत वाचवले हजारो रुग्णांचे प्राण !
ग्लोबल हॉस्पिटल ४थ्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा!

चार वर्षांपूर्वी नवी दिल्ली येथील एम्स वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक किर्तीचे -हदयरोग तज्ञ तथा एम्स वैद्यकीय महाविद्यालयाच्या कार्डियोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. एस. सी. मनचंदा यांच्या हाताखाली कॉर्डियोलॉजी मधृये पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या डॉ. दिपक कटारे यांनी आपल्या वडिलांच्या इच्छेनुसार अंबाजोगाई येथे कॉर्डियोलॉजी चे स्वतंत्र खाजगी रुग्णालय सुरु करण्याची हिंमत केली. डॉ. एस. सी. मनचंदा यांच्या हस्ते “ग्लोबल हार्ट केअर ऍंड डायग्नॉस्टिक सेंटर” हे रुग्णालय सुरु केले.


मागील चार वर्षांत डॉ . दिपक कटारे यांनी सुरु केलेल्या ग्लोबल हॉस्पिटल मध्ये रुग्णालयात येणाऱ्या -हदयरुग्णावर उपचार करतांना अत्याधुनिक उपचार पद्धतीचा वापर करीत हजारो रुग्णांचे प्राण वाचवले. एवढेच नव्हे तर मराठवाडा विभागातील -हदयरोग रुग्णांना मुंबई -पुणे येथे मिळणा-या अत्याधुनिक उपचार सुविधा मिळाव्यात म्हणून लातुर येथे अत्याधुनिक कॉर्डियोलॉजी हॉस्पिटल उभारण्याचे बळ त्यांना मिळाले.
मागील चार वर्षांत डॉ. दिपक कटारे यांनी बीड, लातुर, धाराशिव, परभणी या जिल्ह्यातील हजारो रुग्णांचे प्राण वाचवले आहेत. आज ग्लोबल हॉस्पिटल ची सुरुवात करुन चार वर्षांचा कालावधी पुर्ण झाला आहे. आज चौथा वर्धापन दिन साजरा करतांना ग्लोबल हॉस्पिटल ऍन्ड डायग्नॉस्टिक सेंटर चे डॉ. दिपक कटारे व त्यांच्या सर्व टीम ला
अधिकाधिक रुग्णांचे प्राण वाचवण्याची शक्ती देवो, ही शुभेच्छा!

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button