Uncategorized

चो-या, विद्यार्थिनींचे संरक्षणाबाबत पोलिस निरीक्षकांना दिले निवेदन


अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक विनोद घोळवे हे अंबाजोगाई येथे रूजु होवुन पदभार स्वीकारल्याबद्दल शिवसेना युवासेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी शहरातील दुकान फोडी, महिला व मुलींचे संरक्षण व इतर समस्यांबाबत निवेदन देण्यात आले.
या वेळी माजी बांधकाम सभापती, संतोष भैय्या काळे, युवासेना तालुकाप्रमुख अक्षय भुमकर, विधासभा प्रमुख अभिमन्यु वैष्णव, सुनिल सुरवसे, गणेश कडबाने, मुकेश घुबडे, राजु गोरे उपस्थित होते. तसेच प्रत्यक्ष भेटी दरम्यान अनेक विषयांवर चर्चा देखील करण्यात आली यात.


यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात खालील मागण्या करण्यात आल्या आहेत. प्रामुख्याने शहरातील सर्वच भागातील कोचिंग क्लासेसच्या परिसरात, शहरातील शालेय परिसरात महिलांच्या विद्यार्थीनींच्या सुरक्षिततेबाबत शहरात दामीनीपथक सुरु करण्याची मागणी युवासेनेच्या वतीने करण्यात आली. शहरातील सर्वच कनिष्ठ वरिष्ठ महाविद्यालयात #दामीनीपथकाची प्रत्यक्ष फेरी नियमीत सुरू करण्यात यावी हि आग्रही मागणी करण्यात आली.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते आनंद नगर परिसरातील कोचिंग क्लासेस च्या आवारात पोलीस गस्त सुरू करणे तसेच तथागत चौक ते पोखरी रोड येथील शाळे परिसरात पोलीस गस्त दामिनी पथकाच्या फेऱ्या सुरू करण्यात याव्यात.
सावरकर चौक ते मीनाताई ठाकरे चौक या मार्गावर मोठ्या प्रमाणात दवाखाने व लहान मुलांच्या शाळा असल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण होते या ठीकाणी वाहतुक पोलीस काॅनस्टेबल यांना नियमीत पाचारण करण्यात यावे.

योगेश्वरी मंदिर परिसरातील, हत्तीखाना, दासोपंतमंदिर,महामृत्युंजय मंदिर, मुकुंदराज स्वामी मंदिर परिसरात पोलीस गस्त फेरीत नियमीत कराव्यात आशा मागण्या या वेळेस करण्यात आल्या असुन या मागण्या पोलीस निरीक्षक साहेब यांनी सकारात्मक प्रतिसाद देत येत्या दोन चार दिवसांत या विषयावरील मागण्या कार्यरत करण्यात येतील असे आश्वासन देऊन लवकच या मागण्यातील विषयावर कारवाई करण्याचे सांगीतले.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button