महाराष्ट्र

नंदकिशोर मुंदडा यांचा अभुतपुर्व पदग्रहण सोहळा!

नवनिर्वाचित नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांनी आज हजारो नागरिकांच्या साक्षीने नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. दरम्यान त्यांच्या स्वागतासाठी आज शहरभर मिरवणूक काढण्यात आली. यावेळी शहरभर कमानी उभारण्यात येवून ठिकठिकाणी फुलांची उधळण करीत त्यांचे स्वागत करण्यात आले.
अंबाजोगाई नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत नंदकिशोर मुंदडा यांनी राजकिशोर मोदी यांचा सरळ पराभव करीत दणदणीत विजय मिळवला. या विजयानंतर १५ व्या दिवशी त्यांनी नगराध्यक्ष पदाचा पदभार मुख्याधिकारी प्रियांका टोंंगे यांच्या कडून स्वीकारला.
नंदकिशोर मुंदडा यांनी पदभार घेण्यापुर्वी त्यांची अक्षय निवासस्थाना पासून शहरभर स्वागत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी संपुर्ण शहर स्वागत कमानींनी पुर्णपणे सजवण्यात आले होते.

Nandkishor mundada and Sudarshan Rapatwar


नंदकिशोर मुंदडा यांनी आपल्या आयुष्यात नगराध्यक्ष पदाची पहिली निवडणूक लढवली व ते मोठ्या मतांनी विजयी ही झाले. त्यांच्या विजयाचा आनंदोत्सव शहरातील लोकांना सहज साजरा करता यावा यासाठी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्विकारण्यापुर्वी त्यांची हजारो समर्थकांसह शहरातील सर्व प्रमुख मार्गावरून विजयी मिरवणूक काढण्यात आली होती.
सदरील विजयी मिरवणूक ही छत्रपती चौक – जोगाईवाडी ग्रामपंचायत, राजीव गांधी चौक,
मोंढा कमान, छत्रपती शिवाजी महाराज चौक – किशोर कुमार परदेशी, गुरुवार पेठ, अनुपम गारमेंटस, योगेश्वरी मंदीर,
बलूत्याचा मळा, तानाजी मालुसरे चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक , बाळासाहेब ठाकरे चौक, अहिल्या माता चौक, स्वातंत्र्यवीर सावरकर चौक मार्गे नगर परिषद कार्यालयाकडे आली.
ही विजयी मिरवणूक ढोल ताशांची पथके, तोफांची सलामी आणि फुलांच्या उधळणीने नागरीकांचे लक्ष वेधून घेत होती. शहरातील अनेक प्रभागातुन ही मिरवणूक जात असताना नागरिकांनी फुलांची उधळण करीत नंदकिशोर मुंदडा यांचे स्वागत केले.

▪️सात तास चालली स्वागत
मिरवणूक!
नंदकिशोर मुंदडा यांच्या स्वागतासाठी अक्षय निवासस्थानापासून सकाळी ९ वाजता स्वागत मिरवणूक निघाली. शहरातील प्रमुख मार्गावरून नागरिकांचे स्वागत घेत नगर परिषदेच्या कार्यालयापर्यंन्त ही मिरवणूक येण्यास तब्बल ७ तास लागले.

▪️गुलाल मुक्त मिरवणूक!
नंदकिशोर मुंदडा यांच्या स्वागतासाठी काढण्यात आलेली ही मिरवणूक पुर्णतः गुलाल मुक्त काढण्यात आली होती. या मिरवणुकीत गुलाला ऐवजी फुलांची मुक्त उधळण करण्यात आली. फुलांची ही उधळण करण्यासाठी अनेक ठिकाणी जेसीबीचा वापर करण्यात आला.

▪️रमाई आवास बीलावर केली
पहिली स्वाक्षरी!
नंदकिशोर मुंदडा यांनी नगर परिषद कार्यालयात बसवण्यात आलेल्या लिफ्ट चे लोकार्पण करुन कार्यालयात प्रवेश केला. मुख्याधिकारी प्रियांका टोंंगे यांच्या कडुन पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी कर्मचारी आणि उपस्थित नागरिकांना समोर नगर परिषदेच्या वतीने करण्यात आलेल्या आपल्या सत्काराला उत्तर देणारे छोटेखानी भाषण ही केले. यानंतर त्यांनी पहिली स्वाक्षरी रमाई आवास च्या बीलावर केली असल्याचे समजते.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button