Uncategorized
अवकाळी पावसाने वाढवली मांजरा धरणाची पाणी पातळी!

बीड जिल्ह्यासह संपुर्ण महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. बीड जिल्ह्यात तर मागील काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसाने कहरच केला आहे. दोन दिवसांपूर्वी बिंदुसरा धरण ओव्हर फ्लो झाले आहे तर मांजरा आणि माजलगाव धरणाची पाणी पातळी या अवकाळी पावसाने वाढवली आहे.
बीड लातूर धाराशिव जिल्ह्यातील शेकडो गावांना होतात पाणीपुरवठा
बीड जिल्ह्यासह लातुर आणि धाराशिव जिल्ह्यातील शेकडो गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणाची पाणी पातळी में महिन्याच्या सुरुवातीला बरीच खाली गेली होती. मांजरा धरणातील पाण्याची सतत नोंद ठेवणा-या लातुर येथील पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता कार्यालयाने दिलेल्या नोंदी नुसार २६ मे २०२५ रोजी मांजरा धरणातील जिवंत पाणी साठा हा फक्त १९.८७ टक्के एवढाच होता. मात्र मागील १५ दिवसांत झालेल्या अवकाळी पावसाने या धरणातील जिवंत पाणी साठा १९.८७ टक्क्यावरुन सरळ २४. ३६ टक्क्यांवर जावून ठेपला आहे.

