मांजरा धरण भरण्याची शक्यता; नदीकाठच्या गावांना पाटबंधारे विभागाने दिला सतर्कतेचा इशारा!!
मांजरा धरण भरण्याची शक्यता…!
नदीकाठच्या गावांना पाटबंधारे विभागाने दिला सतर्कतेचा इशारा

अंबाजोगाई (प्रतिनिधी)–
बीड लातुर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील जलसिंचनाचा महत्वाचा प्रकल्प असलेले केज तालुक्यातील धनेगाव येथे असलेले मांजरा धरण भरण्याची शक्यता निर्माण झाली असून पाटबंधारे विभागाच्या वतीने मांजरानदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
मांजरा धरणावर नियंत्रण ठेवण्यासाठीची जबाबदारी असलेल्या लातुर येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता यांनी ९ ऑक्टोबर २०२२ रोजी तातडीच्या सुचना दिल्या असून या सुचनेचे पत्र बीड, लातुर, उस्मानाबाद आणि बिदर येथील जिल्हाधिकारी यांना दिले आहे.
या तातडीच्या सुचना पत्रात पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता यांनी पुढे म्हटले आहे की, उपरोक्त विषयानुसार कळविण्यात येते की, दिनांक 19/10/2022 रोजीची सकाळी 6.00 वा.ची मांजरा
प्रकल्पाची पाणी पातळी 64133 मी. असून धरणातील उपयुक्त पाणीसाठा 76.11 टक्के आहे. यानुसार प्रकल्पामध्ये येणारा सेवा विचारात घेता प्रकल्प त्यांच्या निर्धारीत पातळीस केव्हाही भरण्याची शक्यता असून त्याअनुषंगाने नदीपात्रता विसर्ग सोडण्याची शक्यता आहे तरी आपणास विनंती की, मांजरा नदीकाठावरील शेतकरी किंवा वस्ती करून राहीलेले नागरीक यांना
सावधानतेचा इशारा आपले स्तरावरून निर्गमित करावे व इतर आवश्यक कार्यवाही करण्यात यावी ही विनंती.
जेणेकरून निधीत व वित्त हानी होणार नाही.
सदरील पत्राच्या प्रति योग्य त्या कार्यवाही साठी कार्यकारी अभियंता
लातूर चार विभाग लातूर, औरंगाबाद,
अधीक्षक अभियंता व लाभक्षेत्र विकास प्राधीकरण लातूर, निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्ला पोलीस अधीक्षक, लातूर उस्मानाबाद/ बीड, मा. मुख्य अभियंता प्रशासक लाभक्षेत्र विकास (संवि) यांना माहीतीस्तव व पुढील कार्यवाहीस्तव सस्नेह अग्रेषित, आपण आपल्या अधिपत्याखालील बंधारेची दरवाजे / इतर साहीत्य पुरेशा प्रमाणात काढून घ्यावेत.
कार्यकारी अभियंता लातूर लघु पाटबंधारे विभाग, लातूर, कार्यकारी अभियंता निम्न तेरणा कालवा विभाग क्र. 2 लातूर, कार्यकारी अभियंता, लातूर पाटबंधारे विभाग क्र. 2 लातूर
जिल्हा माहीती प्रसारण अधिकारी लातूर/बीड/ उस्मानाबाद यांना माहीत कृपया टि. की. रेडीओ द्वारे सोबतच्या सूचना प्रसारीत कराव्यात ही विनंती प्रत, विभागीय अधिकारी तथा उप जिल्हाधिकारी, अंबाजोगाई लातूर/ भूम/ उदगीर, आयुक्त महानगरपालीका लातूर/ मुख्य अधिकारी नगर परिषद अं 11 प्रत व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडल लातूर अंबाजोगाई क
उपविभागीय अभियंता पाटबंधारे उपविभाग क्र. 1.2.34 लातूर 15 निलंगा, तहसीलदार तहसील कार्यालय लातूररेणापूर/अंबाजोगाई निलंग्/उदगीर कृपया आपले अधिनस्त संबंधीत तलाठी यांनी करावे,
शाखा अधिकारी पाटबंधारे सिन शाखा बनेगा 2.3.4 लातूर/ क्र.6ळगा 7
, केंद्र अधिकारी, आकाशवाणी केंद्र, औरंगाबाद परभणी यांना देण्यात आलेल्या आहेत.