महाराष्ट्र

पारंपारिक पध्दतीला फाटा देत गुरुदेव सेवा आश्रमाला मदत देवून साजरी केली संक्रांत

संक्रांत ती निमित्ताने पारंपारिक पध्दतीने हळदी कुंकवाचा कार्यक्रम करुन पैशांचा विनियोग न करता घाटनांदुर येथील गुरुदेव सेवा आश्रमास भरघोस आर्थिक मदत करीत येथील मेडिकल टिचर्स नी एकत्रित येऊन मकर संक्रांती साजरी केली.

मेडिकल टिचर्स चा अनोखा उपक्रम


येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत असलेल्या मेडिकल टिचर्स गेली अनेक वर्षांपासून मकर संक्रांतीचा उत्सव पारंपारिक पध्दतीला फाटा देवून मकर संक्रांतीच्या निमित्ताने हळदीकुंकवाचा कार्यक्रम अगदी साध्या पध्दतीने साजरा करुन त्या निमित्ताने जमवलेली रक्कम एखाद्या गरजू संस्थेला देवून आगळ्यावेगळ्या पद्धतीने मकर संक्रांतीचा सण साजरा करतात.
येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या टिचर्स डॉ. सौ. सुनिता बिराजदार, डॉ. सौ. दिपाली देशपांडे, डॉ. सौ. सुनिता शेट्ये, डॉ. सौ. शिला गायकवाड, डॉ.सौ. दिपाली बर्दापुरकर, डॉ. सौ.निलीमा भिसे, डॉ. सौ. सविता तोष्णिवाल, डॉ. सौ. वर्षा दहिफळे, डॉ. सौ. अपर्णा कुलकर्णी, डॉ. सौ. मोहिनी जोगदंड, डॉ. सौ. पुष्पा कावळे या सर्वांनी एकत्र येत घाटनांदुर येथील गुरुदास सेवा आश्रमास भेट देत येथील सभागृहात टाइल्स बसवण्यासाठी आर्थिक मदत देवून आश्रमातील सर्व सदस्यांना भोजन देवून त्यांचे सोबत भोजनाचा आस्वाद घेतला.


यावेळी आश्रमाचे प्रमुख दासलालजी महाराज, गुरुमाय बहिणाबाई दहिवाळ, शामाताई गुरुदेव दहिवाळ, यमुनाबाई सोनवणे यांचा मेडिकल टिचर्सनी त्यांच्या चांगल्या कामाचे कौतुक करीत त्यांचा सत्कार केला. यानंतर सर्व मेडिकल टिचर्सनी आश्रमातील वृध्द सदस्यांसोबत संक्रांती निमित्ताने आयोजित तीळाच्या पोळ्यांसह भोजनाचा आस्वाद घेतला. यवेळी आश्रमातील सर्व सदस्यांची उपस्थिती होती.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button