Uncategorized

स्वाराती तील प्रा.ममता राठी जळीत प्रकरणाचे गुढ कायम; चर्चांना उधाण


अंबाजोगाई शहरातील स्वामी रामानंद तीर्थ कला व वाणिज्य महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापिका ममता राठी यांनी ४ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता अंबाजोगाई शहरालगत असलेल्या गीता भारज या रस्त्यावर स्वतः ला जाळून घेण्याचा प्रयत्न केला असल्याची चर्चा असून त्यांनी स्वतः जाळून घेतले की त्यांना जाळण्याचा प्रयत्न झाला या बाबतचे गुढ अद्याप कायम आहे. दरम्यान या जळीत प्रकरणात प्रा. ममता राठी या ८० टक्के भाजल्या गेल्या असून त्यांचेवर लातुर येथील विवेकानंद हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु असल्याची माहिती मिळते आहे.


अंबाजोगाई शहरातील स्वामी रामानंद तीर्थ कला व वाणिज्य विभागात प्रा. ममता राठी या वाणिज्य विभागात प्राध्यापिका म्हणून गेली अनेक वर्षे कार्यरत आहेत. त्या अंबाजोगाई शहरातील मोदी लर्निंग स्कुल च्या पाठीमागे झालेल्या नवीन वस्तीत रहातात. अलिकडेच त्यांना सहयोगी प्राध्यापक म्हणून पदोन्नती ही झाली होती.


४ जानेवारी रोजी रात्री उशिरा शहरातील काही लोकांना प्रा. ममता राठी यांना जाळण्याचा प्रयत्न झाला अशी माहिती मिळाली. मात्र या चर्चेबाबत कोणतीही ठोस माहिती कोणाकडे ही उपलब्ध नव्हती.


५ जानेवारी रोजी सकाळी ही चर्चा शहरभर पसरली. ४ जानेवारी रोजी त्यांनी गीता-भारज या रस्त्यावर पेट्रोल अंगावर टाकून जाळून घेण्याचा प्रयत्न केला अथवा त्यांना जाळून मारण्याचा प्रयत्न केला गेला अशी चर्चा या निमित्ताने शहरभर होत आहे. यावेळी त्यांच्या समवेत शहरातील त्याच महाविद्यालयातील एक प्राध्यापक असल्याचेही चर्चा शहरात होत आहे.


सदरील जळीत घटनेनंतर प्रा. ममता राठी यांनी यांनी आपल्या पतीला दुरध्वनी करुन आपण जळालेल्या अवस्थेत असून लातुर येथे उपचारासाठी येत असल्याची माहिती दिली. त्या लातुर येथे गेल्यावर त्यांचेवर तेथील एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.


दरम्यान प्रा. ममता राठी या जळीत प्रकरणात ८० टक्के भाजल्या गेल्या असल्याची अधिकृत माहिती मिळते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांचा गुडघ्यापासून मानेच्या खालच्या भागाला हनी पोहोचली असली तरी आतील कोणत्याही अवयवाला धोका पोहोचला नाही. आज त्यांचेवर छोटीशी शस्त्रक्रिया ही करण्यात आल्याची माहिती मिळते.
या जळीत प्रकरणास २४ तसं उलटून गेले असले तरी अजून ही प्रा. ममता राठी अथवा त्यांच्या नातेवाईकांनी कोणतेही स्पष्टीकरण केले नसल्यामुळे या बाबतचे गुढ कायम राहीले आहे.


सदरील घटना ही बर्दापुर पोलिस स्टेशन घ्या हद्दीमध्ये घडली असल्यामुळे बर्दापुर पोलिसांनी लातुर येथील हॉस्पिटल ला भेट देऊन प्रा. राठी यांचा जबाब घेण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रा. ममता राठी यांनी अद्दाप पोलिसांना जबाब ही दिला नसल्याचे समजते.


प्रा. ममता राठी जळीत प्रकरणास २४ तास उलटून गेले असले तरी अद्याप पर्यंत त्यांनी जाळून घेतली की त्यांना जीवंत जाळण्याचा प्रयत्न झाला याबाबत स्पष्टता निर्माण झाली नाही. दरम्यान बर्दापुर पोलिस या सर्व प्रकरणातील घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button