महाराष्ट्र
अक्षय मुंदडा यांच्या वाढदिवसानिमित्त “चला हवा येवू द्या” व “मराठी पावूल पडते पुढे” कार्यक्रमाचे आयोजन

शहराध्यक्ष संजय गंभीरे यांची माहिती
भारतीय जनता पार्टीचे युवा नेते अक्षय मुंदडा यांचा 13 मे रोजी वाढदिवस असुन त्या निमित्ताने अंबाजोगाई शहरात भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ज्यामध्ये “चला हवा येऊ द्या” आणि “मराठी पाऊल पढते पुढे” याचा समावेश असुन शहर तथा पंचक्रोशीतील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन पक्षाचे शहराध्यक्ष संजय गंभीरे यांनी केले.

सेंट ऍन्थोनी स्कुल येथे होणार कार्यक्रम
हा भव्य कार्यक्रम शहरातील मध्यभागी असलेल्या “सेंट अँन्थोनी स्कुल” च्या मैदानावर घेतला जात असुन व्यवस्थेतील प्रमुख पदाधिकार्यांनी त्या दृष्टीने मैदानाची काल पहाणी करत रचना केली आहे. युवा नेते अक्षय मुंदडा यांचा वाढदिवस तसं पहाता मोठ्या प्रमाणात साजरा करणे त्यांना स्वत:च मान्य नसते. मात्र कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव यंदा विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे ठरवल्याचे गंभीरे यांनी सांगितले.
“चला हवा येऊ द्या” हा कार्यक्रम विनोदी म्हणुन ओळखल्या जातो. ज्यामध्ये निलेश साबळे, भाऊ कदम, सागर करांडे, कुशाल बद्रिके, भारत गणेशपुरे, श्रेया बुगडे आदींचा समावेश आहे. मागच्या दहा वर्षापासुन कार्यक्रम खर्या अर्थाने महाराष्ट्राच्या घराघरात जावुन पोहोचलेला असुन तो पहाण्यासाठी लोकांची गर्दी देखील मोठ्या प्रमाणावर वाढते. झी मराठीच्या चॅनेलवर प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमाचा मोठा प्रेक्षक वर्ग आहे.
