महाराष्ट्र
संभाजीनगर च्या शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाचा “लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् ” मध्ये समावेश
संपूर्ण मराठवाडा विभागातील एकमेव शासकीय दंत शिक्षणसंस्था असलेल्या संभाजीनगर येथील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाचा ‘लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’ मध्ये समावेश करण्यात आला आहे.
संभाजीनगर येथील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय या संस्थेला “शासकीय दंत संस्थेद्वारे आयोजित सर्वात मोठ्या मुख आरोग्य जनजागृती व तपासणी मोहिमेसाठी” हे जगप्रसिद्ध विक्रम प्रमाणपत्र बहाल करण्यात आले आहे. या अभियानातून हजारो नागरिकांपर्यंत मोफत मुख तपासणी, मार्गदर्शन व उपचार पोहोचविण्यात आले. या महत्त्वपूर्ण उपक्रमातून केवळ आरोग्य विषयक जागरूकता वाढविण्यात आली नाही तर दंतचिकित्सा क्षेत्रातील व्यावसायिक गुणवत्ता, समाज भिमुखता आणि सामाजिक बांधिलकी यांचाही ठसा उमटवण्यात आला.

ही नोंद ‘लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’ मध्ये करण्यात आली असून, प्रमाणपत्र क्रमांक LBOWRE4010537 आहे व दिनांक २१/०६/२०२५ असा आहे.

या यशानंतर महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. माया इंदुरकर यांनी सांगितले, “हे यश केवळ माझे किंवा संस्थेचे नाही, तर हे यश आहे संपूर्ण GDC परिवाराचे – आमचे सर्व प्राध्यापक, नर्सेस, रुग्णालय कर्मचारी, विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी यांच्या सामूहिक प्रयत्नांचे. समाजासाठी काहीतरी मोठं करावं, या भावनेतून ही मोहीम उभी राहिली. आज ‘लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’ मध्ये आमच्या कार्याची दखल घेतली गेली, ही भावना खूपच आनंददायी आहे.”
महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी डॉ. आदित्य पतकराव यांनी केले अभिनंदन!


