गाडीलोहार समाजाने केला नंदकिशोर मुंदडा यांचा कृतज्ञता आभार सत्कार

गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सो आ क्ष गाडीलोहार समाजाच्या स्मशानभुमीचा प्रश्न अखेर गेल्या आठवड्यात आमदार नमिता ताई अक्षय मुंदडा व सामाजिक जेष्ठ नेते नंदकिशोर काकाजी मुंदडा यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे अखेर मार्गी लागल्याने सो आ क्ष गाडीलोहार समाजाच्या स्मशानभुमीची प्रतिक्षा करण्याची चिंता अता कायमची संपली.
गेल्या अनेक दशकांपासून अंबाजोगाई शहरात सो आ क्ष गाडीलोहार समाज हा मोठ्या प्रमाणात वास्तव करत असुन या समाजाच्या स्मशानभुमीचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता त्यामुळे या समाजास पावसाळ्यात अंत्यसंस्कार करण्याकरीता अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असे. सुरक्षीत असा निवारा व कायमस्वरूपी स्मशानभुमीस जागा या समाजास नसल्यामुळे अनेक वर्ष अंत्यसंस्कार करण्यास या समाजाला अनेक प्रसंगाला सामोरे जावे लागत होते. परंतु गेल्या काही वर्षांपासून ह्या समाजातील अक्षय भुमकर सह काही युवकांनी हा स्मशानभुमीची समस्या आमदार नमिता ताई अक्षय मुंदडा व नंदकिशोर काकाजी मुंदडा यांच्या कडे आणी प्रशासनाकडे जाऊन स्मशानभुमीस जागा मिळवुन देण्या करीता प्रश्न उपस्थित केला असता.
स्मशानभूमीला मिळवून दिला हक्काची जागा!
आमदार नमिता ताई मुंदडा व नंदकिशोर मुंदडा यांनी सातत्याने याचा शासन दरबारी व प्रशासकीय कार्यालय पाठपुरावा करून स्मशानभुमीस जागा उपलब्ध करून देण्या करीता अग्रही भुमिका निभावून या समाजास न्याय मिळवून दिला. व सो आ क्ष गाडीलोहार समाजाच्या अनेक वर्षांपासून होणाऱ्या समस्येचा त्रास हा आमदार नमिता ताई अक्षय मुंदडा व सामाजिक जेष्ठ नेते नंदकिशोर काकाजी मुंदडा यांच्या पाठपुराव्यामुळेच संपला असे मत गाडीलोहार समाज युवा कार्यकारणी उपाध्यक्ष अक्षय भुमकर यांनी स्पष्ट केले त्यामुळे याचे खरे श्रेय मुंदडा कुटुंब व माजी उपनगराध्यक्ष सारंग पुजारी यांना जाते असे या वेळेस सांगीतले.
श्री रेणुका मंदिर रोड जवळील परिसरात सर्वे नंबर 621/2/1 मधुन 15 गुंठे शासकीय गायरानातुन जागा सो आ क्ष गाडीलोहार समाज स्मशानभुमीस देण्यात आली आहे. याच्या बद्दल सर्व समाज बांधवांच्या वतीने आज सामाजिक जेष्ठ नेते नंदकिशोर काकाजी मुंदडा यांचा कृतज्ञतापूर्वक हृदय सत्कार सो आ क्ष गाडीलोहार समाज अंबाजोगाई यांच्या वतीने करण्यात आला. आमदार नमिता ताई अक्षय मुंदडा, नंदकिशोर काकाजी मुंदडा, माजी उपनगराध्यक्ष सारंग भाई पुजारी यांनी समाजाकरीता केलेल्या कार्याबद्दल आभार मानुन हा सत्कार करण्यात आला यावेळी. राजेश कामळे, अरूण पिंपळे, राजकुमार पिंपळे, गोविंद पिंपळे, रमण सोनवळकर,मारूती पंचभाई, कैलास छत्रबंद, गणेश पंचभाई, नरेश उबाळे, युवा कार्यकारिणी अध्यक्ष गौरव कामळे, उपाध्यक्ष अक्षय भुमकर, सचिव श्रीनिवास पिंपळे,कोषाध्यक्ष शाम पिंपळे, अँड अक्षय कामळे,महेश तपके,सचिन नवगीरे,गणेश नंदगवळी,मल्हार छत्रबंद, प्रविण सोनवळकर, रूपेश पिंपळे, विवेक पंचभाई, सचिन उबाळे, यांसह समाजातील सर्व जेष्ठ समाज बांधव, युवक उपस्थित होते.




