राहुल गांधी यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

पुन्हा खासदार होण्याचा मार्ग मोकळा!
मोदी आडनावाची मानहानी केल्याप्रकरणी राहुल गांधी यांना गुजरातच्या न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली होती. या निर्णयाच्या विरोधात राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च स्थगिती दिली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांना आता त्यांची खासदारकी पुन्हा मिळण्याचा मार्ग मोकळा आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधींना (Rahul Gandhi) मोठा दिलासा मिळाला असून मोदी आडनावाच्या मानहाणीप्रकरणी मिळालेल्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे राहुल गांधी यांना त्यांची खासदारकी पुन्हा मिळणार आहे…
सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना सत्र न्यायालयाला फटकारलं आहे. ट्रायल कोर्टाला एवढी मोठी शिक्षा देण्याची गरज काय होती? एवढी शिक्षा देण्यामागचं कारणही कोर्टाने दिलेलं नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. यावेळी कोर्टाने राहुल गांधी यांना कानपिचक्याही दिल्या आहेत. राहुल गांधी यांचं विधान आपत्तीकारक होतं. मात्र, एवढी मोठी शिक्षा देण्याचं कारण कनिष्ठ न्यायालयाने स्पष्ट केलेलं नाही. तसेच त्यावर गुजरात उच्च न्यायालयाने विचारही केला नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.
राहुल गांधी यांच्या कडून स्वागत
सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर राहुल गांधी यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राहुल गांधी यांनी कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. द्वेषावर प्रेमाने मिळवलेला हा विजय आहे. सत्यमेव जयते, जय हिंद, असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे.
कोर्टात काय झालं?
राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आल्याच्या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झा गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयात सुनावणईसाठी अर्ध्या तासाची वेळ राखून ठेवण्यात आली होती. दोन्ही पक्षाच्या वकिलांना केवळ 15-15 मिनिटे बाजू मांडण्यासाठी दिले होते. आम्ही कोणत्याही समुदायाचा अपमान केला नाही. या प्रकरणात केवळ राहुल गांधी यांनाच शिक्षा सुनावण्यात आल्याचं राहुल गांधी यांच्या वकिलाने कोर्टाला सांगितलं.
पूर्णेश मोदी यांनी जो युक्तिवाद केला होता, त्यावर सर्वोच्च न्यायालयाने कठोर शब्दात भाष्य केलं. तुम्हाला किती नेत्यांची जुनी भाषणे आठवतात?, असा सवाल कोर्टाने केला.
राहुल गांधी विरोधात पुरावा नाही
राहुल गांधी यांनी भाषणात ज्या लोकांची नावे घेतली आहेत. त्यापैकी कुणीच खटला दाखल केलेला नाही. फक्त भाजपच्या नेत्यांनी खटला दाखल केला आहे. याचिका दाखल करणाऱ्याचं खरं आडनाव मोदी नाह त्यांचं आडनाव मोध आहे. त्यावरून ते मोदी झाले. त्यामुळे राहुल गांधी यांनी कुणाचीही बदनामी केलेली नाही. त्यांच्याविरोधात कोणताही पुरावा नाही, असं राहुल गांधी यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी सांगितलं.
मोदी आडनावाचे बदनामी नाही
दरम्यान, मोदी आडनाव घेतल्याने कुणाचीही बदनामी झाली नाही. पण राहुल गांधी यांनी बोलताना जपून प्रतिक्रिया द्यावी, असं कोर्टाने म्हटलं आहे.
