ठळक बातम्या

बीडच्या पत्रकार शेख आयेशा यांचा मुंबईत वर्षा निवासस्थानी सौ.अमृता देवेंद्र फडणवीस यांनी केला जल्लोषात वाढदिवस साजरा

बीडच्या पत्रकार शेख आयेशा यांचा मुंबईत वर्षा निवासस्थानी सौ.अमृता देवेंद्र फडणवीस यांनी केला जल्लोषात वाढदिवस साजरा

बीड येथील लोकजगतच्या संपादक शेख आयेशा यांनी अतिशय कमी कालावधीत पत्रकारिता क्षेत्रात आणि तृतीयपंथीयांसह सामाजिक कार्यात सुरू केलेले कार्य उल्लेखनीय आहे. यामुळेच आज मी माझ्या एका चांगल्या जिवलग मैत्रिणीचा वाढदिवस वर्षा निवासस्थानी साजरा केला असे प्रतिपादन वाढदिवसानंतर सौ. अमृता देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा देताना व्यक्त केले.
मुंबई येथील मुख्यमंत्र्यांच्या शासकीय वर्षा बंगल्यावर 1 जानेवारी रोजी पत्रकार शेख आयेशा यांचा वाढदिवस मुख्यमंत्री यांच्या सुविधा पत्नी तथा बँकर, सुप्रसिद्ध गायिका, अभिनेत्री आणि सामाजिक कार्यकर्त्या म्हणून प्रसिद्ध असलेल्या सौ.अमृता देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय वर्षा या बंगल्यावर वाढदिवस साजरा केला. यावेळी त्यांनी पत्रकार शेख आयेशा यांना शुभेच्छा देताना म्हटले की, तृतीयपंथीयांच्या सक्षमीकरणावर आणि अल्पसंख्याक समाजातील अन्यायग्रस्त महिलांना न्याय देण्यासाठी सुरू केलेला लढा निश्चितच कौतुकास्पद आहे. मला देखील सामाजिक कार्य करणाऱ्या महिलांबद्दल कौतुक वाटते. एका ग्रामीण भागातून थेट मुंबई पर्यंत माझ्यासोबत त्यांनी जो विश्वास संपादन केला हि बाब नक्कीच कौतुकास्पद आहे. भविष्यात त्यांच्या आश्रय सेवाभावी संस्थेला आम्ही सामाजिक कार्य करत असलेल्या दिव्याज फाउंडेशन अंतर्गत निश्चित तृतीयपंथीयांसह महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी सहकार्य करू असा विश्वास व्यक्त केला. वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ, भेटवस्तू आणि तोंड गोड करून वाढदिवस त्यांनी मोठ्या आनंदाने साजरा केला. वाढदिवसानिमित्त खास निमंत्रित करून कुठलेही नाते संबंध नसतानाही एका ग्रामीण भागातील वृत्तपत्र सृष्टीत काम करणाऱ्या महिलेला मैत्रिण म्हणून बोलावून पाहुण्यांनाही लाजवेल एवढे आदरातिथ्य करून आस्थेवायीकपणे केलेला संपूर्ण पाहुणचार नेत्रदीपक आणि स्वप्नवतच वाटत आहे. माझा माझ्यावरच विश्वास बसत नाही मी एक सामान्य कुटुंबातील अल्पसंख्याक समाजातील महिला असताना सुद्धा थेट मुख्यमंत्र्यांच्या सुविद्य पत्नीने माझा वाढदिवस मुख्यमंत्र्यांच्या शासकीय बंगल्यावर करावा हा माझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय क्षण आहे अशा आपल्या भावना त्यांनी आनंदाश्रूनी व्यक्त केल्या.

Related Articles

Back to top button