महाराष्ट्र
सुनियोजित विकास हाच आमचा अजेंडा; आ. नमिता मुंदडा

केज विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाकरिता मतदारसंघात अनेक विकासकामे सुरू आहेत.केज मतदारसंघाचा सुनियोजित विकास हाच आमचा अजेंडा आहे.मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन महायुतीच्या उमेदवार नमिता अक्षय मुंदडा यांनी केले.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने सायंकाळी मतदारसंघातील लोखंडी सावरगाव, श्रीपतरायवाडी, कोळकानडी माकेगाव , वरपगाव या गावांना भेटी देत, मतदार बंधू-भगिनींशी संवाद साधला यावेळी लोखंडी सावरगाव, श्रीपतरायवाडी, कोळकानडी माकेगाव, वरपगाव येथील तमाम ग्रामस्थ, आजी-माजी सरपंच, ग्रा.सदस्य, सोसायटी चेअरमन, भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते व नागरिक उपस्थित मोठ्या संख्येने होते.

