अंबाजोगाई नगराध्यक्षपदी नंदकिशोर मुंदडा यांनी मारली बाजी

मोदी गटाकडे २० तर मुंदडा गटाकडे फक्त ११ नगरसेवक
अंबाजोगाई नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या सरळ निवडणुकीत नंदकिशोर मुंदडा यांनी राजकिशोर मोदी यांचा २५१० मतांना पराभव करीत विजय मिळवला. तर ३१ नगर सेवकांसाठी झालेल्या निवडणुकीत मोदी गटाला २० तर मुंदडा गटाला ११ नगरसेवक निवडून आणण्यात यश आले.
अंबाजोगाई नगर परिषदेच्या स्थापने नंतर नगराध्यक्ष पदासाठी नंदकिशोर मुंदडा आणि राजकिशोर मोदी यांच्या मध्ये झालेली ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची समजली गेली होती. निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच दोन्ही गटाकडून नगर परीषद आपल्याच ताब्यात राहावी यासाठी जोरदार प्रयत्न केले जात होते.
निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर नंदकिशोर मुंदडा यांनी नगराध्यक्ष पदासाठी आपली उमेदवारी जाहीर केल्यानंतर या निवडणुकीत रंग भरला. नंदकिशोर मुंदडा आणि राजकिशोर मोदी यांच्या मधील सरळ लढत अपेक्षेप्रमाणे जोरदार आणि प्रतिष्ठेची झाली. आणि या लढतीत नंदकिशोर मुंदडा यांनी राजकिशोर मोदी यांचा २५१० मतांनी सरळ पराभव करीत विजय मिळवला.
अंबाजोगाई नगराध्यक्ष पदासोबतच १५ प्रभागातील ३१ नगर सेवकांसाठीही निवडणूक झाली. यामध्ये राजकिशोर मोदी यांच्या गटाने २० नगर सेवक विजयी झाले तर नंदकिशोर मुंदडा गटाचे ११ नगर सेवक विजयी झाले. मोदी गटाचे २० नगर सेवक विजयी झाले असले तरी ते आपल्या गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजकिशोर मोदी यांना विजयी करु शकले नाहीत. याचा अर्थ या विजयी झालेल्या २० उमेदवारांच्या १० प्रभागांमध्ये क्रॉस ओटींग मोठ्या प्रमाणात झाले असण्याची शक्यता आहे.
या उलट मुंदडा गटाचे फक्त ११ नगर सेवक निवडून आले आहेत. मात्र नगराध्यक्ष पदासाठी चे उमेदवार नंदकिशोर मुंदडा हे मात्र राजकिशोर मोदी यांच्यापेक्षा २,५१० अधिकचे मतदान घेवून विजयी झाले आहेत.
अंबाजोगाई नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मतदारांनी नंदकिशोर मुंदडा यांच्या बाजूने कौल दिला असून हा कौल शहराच्या विकास कामांसाठी दिलेला आहे असे स्पष्ट पणे दिसत आहे.
या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी
मुंदडा नंदकिशोर शिवबगस हे तर प्रभाग १ मधून
भालेकर किरण पांडूरंग,
शामशाद बेगम अय्युब कुरेशी
प्रभाग २ मधून
शेख मुस्ताकीम शेख शकील,
काळे मैनाबाई सदाशिव
प्रभाग ३ मधून
कदम महेश बाळासाहेब,
शेख शिरीन अशफाक
प्रभाग ४ मधून
सौ. श्रुती अमोलराव लोमटे,
लोमटे महेश बालासाहेब
प्रभाग ५ मधून
जोगदंड मालू भगवान,
लोमटे संगिता दाजीसाहेब
प्रभाग ६ मधून
क-हाड आकाश जिवनराव,
देशपांडे सुचिता अतुल
प्रभाग ७ मधून
देशमुख गणेश उत्तमराव
सोनल श्रीकांत धायगुडे
प्रभाग ८ मधून
गंभिरे शिल्पा संजय
आंबाड महेश अण्णासाहेब
प्रभाग ९ मधून
भराडिया दिनेश मोतीलाल
लोमटे दिपा बबन ऊर्फ दाजीसाहेब
प्रभाग १० मधून
परदेशी रचना किशोरकुमार
सय्यद ताहेर अब्दुल
प्रभाग ११ मधूनन
सरवदे सोनी दत्तात्रय
हाजी इस्माईल हिरु गवळी
प्रभाग १२ मधून
शेख शमीम शेख रहीम
सय्यद बशीरा शफीक
प्रभाग १३ मधून
जावळे राजपाल संभाजी
पठाण नाजनीन बेगम अकबरखाँ
प्रभाग १४ मधून
आदमाने बबीता महादेव
पठाण नजीर उमरदराजखान पठाण
आणि प्रभाग १५ मधून
साठे जयश्री पृथ्वीराज
जाधव रेखा विलास
काकडे विकास रामकृष्ण
हे विजयी झाले आहेत.