महाराष्ट्र
केज मतदारसंघात ३लाख८७ हजार२२१ मतदार बजावणार मतदानाचा हक्क !

येत्या २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या केज विधानसभा निवडणुकीच्या वेळी मतदार संघातुन ३ लाख ८७ हजार २२१ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार असून या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. अशी माहिती केज चे तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी राकेश गिड्ढे यांनी दिली आहे.

राज्यात होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुका आता जोर धरत असून केज मतदार संघातील निवडणूकीतही चांगलीच रंगत आली आहे. या निवडणुकीत केज मतदार संघातील ३ लाख ८७ हजार २२९ मतदार आपल्या मतदानाचा हक बजावून केज मतदारसंघाचा आमदार ठरवणार आहेत. निवडणूकीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक प्रशासन सज्ज झाले आहे.
मागील ४५ वर्षांपासून हा मतदारसंघ राखीव अनुसूचित जाती जमाती च्या उमेदवारांसाठी आरक्षीत राहिला असून आता आरक्षीत उमेदवारासाठी ही शेवटची निवडणूक ठरणार आहे.

या निवडणुकी साठी प्रशासन सज झाले आहे. या मतदारसंघात एकुण ३ लाख ८७ हजार २२१ मतदारांचा समावेश आहे. या मतदार संघामध्ये केज व अंबाजोगाई तालुक्यातील गावांचा तसेच बीड तालुक्यातील नेकनूर व परिसरातील गावांचा समावेश आहे. मतदारसंघातील मतदारांची संख्या वाढतच आहे.
या मतदारसंघातील एकुण मतदारापैकी २ लाख २ हजार ६२० पुरुष तर १ लाख ८४ हजार महिला या मतदार आहेत. या निवडणुकीत २५ उमेदवार सार्वत्रिक निवडणूकीस सामोरे जात आहेत. या निवडणुकीत २५ उमेदवारांचे भविष्य मतदार संघातील ३ लाख ८७ हजार २२१ मतदार आपल्या मतदानातून २० नोव्हेंबर रोजी मतदानाच्या दिवशी ईव्हीएम मशीनमध्ये बंद करणार आहेत .
या निवडणुकीमध्ये मतदारसंघातील ६ तृतीयपंथीय नागरिक देखील मतदानाचा हक्क बजावागार आहेत. अंबाजोगाई शहरातील ४, मगरवाडी १ व केज शहरातील १ असे ६ तृतीयपंथीय नागरिक मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

▪️५० वयोवृध्द व दिव्यांग मतदारांनी
केले मतदान
या निवडणुकीसाठी मतदार संघातील ५० वयोवृद्ध व दिव्यांग मतदारांनी होम मतदान केले आहे. ज्या नागरिकांना प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदान करणे शक्य नसते. अशा मतदारांसाठी निवडणूक आयोगाने ही विशेष व्यवस्था निर्माण केली आहे. यामुळे त्यांना मतदानाचा हक्क बजावता येतो. होम वोटिंगची सोय मिळण्यासाठी अर्ज केलेल्या ५६ मतदारांपैकी २ मयत झाले. राहिलेल्या ५४ मतदारापैकी ३५ जेष्ठांनी तर १५ दिव्यांग अशा एकुण ५० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असल्याचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा केजचे तहसीलदार राकेश गिडे यांनी सांगीतले.

