Uncategorized

आ. धनंजय मुंडे लवकरच मंत्रिमंडळात दिसतील;माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल

तपास यंत्रणेच्या तपास/चौकशीत धनंजय मुंडे यांचे नाव नाही किंवा त्यांचा संबंध नाही ; प्रफुल्ल पटेल

माजी मंत्री आ. धनंजय मुंडे हे त्यांच्यावर झालेल्या आरोपांच्या नंतर मागील एक वर्षापासून सरकारच्या बाहेर असून, लवकरच ते मंत्रिमंडळात पुनरागम करतील असे सूतोवाच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी केले आहेत.

एका प्रसिद्ध राष्ट्रीय वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत प्रफुल्ल पटेल यांनी धनंजय मुंडे यांना सहन कराव्या लागलेल्या मनस्ताप व त्रासाबद्दल देखील वक्तव्य केले आहे.

बीड जिल्ह्यात तत्कालीन निर्माण झालेल्या परिस्थिती मध्ये जनभावनेचा विचार करून धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला गेला होता. त्या प्रकरणात चौकशी देखील पूर्ण झाली असून यामध्ये कुठेही धनंजय मुंडे यांचे नाव नाही, त्यांच्यावर कुठलाही आरोप नाही, तसेच कुठेही त्यांचा संबंध आढळून आलेला नाही. त्यामुळे त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात सामील केले जाईल, असे वक्तव्य श्री पटेल यांनी केले आहे.

विशेष म्हणजे चार दिवसांपूर्वी प्रफुल्ल पटेल यांनी एका दुसऱ्या वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देखील असेच वक्तव्य केले होते, त्यांनंतर आज एका राष्ट्रीय वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी स्पष्ट वक्तव्य केले आहे.

काही दिवसांपूर्वीच धनंजय मुंडे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्ली येथे भेट घेतल्याने या चर्चांना सुरुवात झाली होती. नुकतेच बीड येथील एका कार्यक्रमानंतर धनंजय मुंडे आपला पुढील दौरा अचानक रद्द करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत हेलिकॉप्टर मधून गेले, त्यामुळेही राज्यातील राजकारणात मोठी चर्चा झाली होती. त्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला असल्याचे दिसून येते.

दरम्यान कुठल्याही चौकशीत धनंजय मुंडे यांचा कुठलाही संबंध नसून ते लवकरच मंत्री म्हणून काम करताना दिसतील असे स्पष्ट करत प्रफुल्ल पटेल यांनी सुसंकेत दिले आहेत!

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button