सुंदरराव सोळंके महाविद्यालयाची “घरोघरी तिरंगा” रॅली संपन्न
विद्यार्थ्यांनी दिला घरोघरी तिरंग्याचा नारा
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/08/WhatsApp-Image-2022-08-10-at-5.59.14-PM.jpeg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/08/WhatsApp-Image-2022-08-10-at-5.59.14-PM.jpeg)
माजलगांव प्रतिनिधी / भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सुंदराराव सोळंके महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने “घरोघरी तिरंगा” रॅली काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी घरोघरी तिरंग्याचा नारा दिला.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव वर्षानिमित्त “घरोघरी तिरंगा” या शासकीय उपक्रमाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीची सुरुवात महाविद्यालय विकास समितीचे प्रमुख ऍड.बी.आर.डक, प्राचार्य डॉ. जी. के. सानप, उपप्राचार्य डॉ.एन.के.मुळे, डॉ.एम.ए.कव्हळे, प्रा. पवनकुमार शिंदे, प्रा. प्रकाश गवते यांच्या हस्ते करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाधिकारी प्रा. नितीन ढवळे, कार्यक्रमाधिकारी प्रा उमेश राठोड, प्रबंधक प्रशांत चव्हाण अधीक्षक सतीश एरंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्राचार्य डॉ सानप यांनी उपक्रमाची पार्श्वभुमी समजावून सांगितली. तसेच येत्या 15 ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होणार आहेत, त्यानिमित्ताने सर्वांनी 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत आपापल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवण्याचे आवाहन केले व आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवताना व उतरवताना कोणत्या बाबींची काळजी घ्यावी याची माहिती दिली. सदरील रॅली महाविद्यालयातुन शिवाजी चौक,डॉ आंबेडकर चौकातून काढण्यात आली. महाविद्यालयात राष्ट्रगीताने रॅलीचा समारोप करण्यात आला. या रॅलीमध्ये प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.