विद्यार्थ्यांनी विविध भाषांमध्ये पारंगत होणे आवश्यक माजी राज्यमंत्री डी पी सावंत
प्रा.डॉ. शंकर विभुते यांच्या 'आयास' कादंबरीचे प्रकाशन
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/08/WhatsApp-Image-2022-08-25-at-3.33.46-PM.jpeg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/08/WhatsApp-Image-2022-08-25-at-3.33.46-PM.jpeg)
नांदेड / संतोष कुलकर्णी
मराठी भाषेचा वाचकवर्ग कमी झाला आहे. त्यामुळे मराठी साहित्याचा वाचक वर्ग वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. बहुभाषिकता वाढावी यासाठी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या भाषा आत्मसात करून त्यामध्ये पारंगत होणे गरजेचे आहे असे मत माजी उच्च शिक्षण राज्यमंत्री डी पी सावंत यांनी व्यक्त केले. नांदेड येथे प्रा. डॉ. शंकर विभुते लिखित ‘आयास ‘ या कादंबरीचे प्रकाशन त्यांच्या हस्ते पार पडले. प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध साहित्यिक वासुदेव मुलाटे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाला महाराष्ट्रातील ख्यातनाम नाटककार माजी प्राचार्य दत्ता भगत, समीक्षक तथा कवी देविदास फुलारी, प्रा. डॉ केशव सखाराम देशमुख प्राचार्य डॉ राजेंद्र माळी,प्रा. डॉ .शंकर विभुते यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
आज प्रत्येक क्षेत्रात विनाआयास काही तरी मिळेल का?
ही प्रवृत्ती वाढत आहे, आयास याचा अर्थच कष्ट, मेहनत, परिश्रम असा होतो. शंकर विभुते लिखित ‘आयास’ या कादंबरीतील नायक प्रचंड कष्टाने उभा राहिला आहे. त्यासोबतच तो आपले चारित्र्य जपतो.ही बाब प्रत्येकाला अत्यंत प्रेरणादायी आहे असे मत डी.पी.सावंत यांनी व्यक्त केले.ते पुढे म्हणाले की,सीमा परिसरातील सांस्कृतिक अनुबंध या कादंबरीने अचूक टिपलेले आहे. आमच्या श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी च्या महाविद्यालयात आज पर्यंत अनेक साहित्यिकांनी भरीव योगदान दिले असून प्रा. डॉ. शंकर विभुते हे आमच्या परिवारातील आहेत याचा आम्हाला अभिमान वाटतो असे ते म्हणाले.
दैनिक उद्याचा मराठवाडा यांच्या वतीने काढण्यात आलेल्या एका विशेष साहित्यिक पुरवणीचे यावेळी विमोचन करण्यात आले. यावेळी बोलताना समीक्षक देविदास फुलारी म्हणाले की आयात या कादंबरीचे कथानक आपल्या आजूबाजूला घडत असल्यासारखे वाचकांना वाटते. लेखकाने कादंबरी लिहीत असताना मिश्र भाषांचा (मराठी, कानडी, तेलगू) वापर करून कथानक रंजक करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे ही कादंबरी वाचताना शेवटच्या पानापर्यंत वाचकांना खिळवून ठेवते. प्रा. डॉ केशव सखाराम देशमुख म्हणाले की, आयास ही कादंबरी मातीनिष्ठा असणाऱ्या तरुणाची, विजयगाथा स्पष्ट करणारी, बहुपदरी, अचंबित करणारी कथा आहे. या कादंबरीने सांस्कृतिक, सामाजिक संदर्भात अस्वस्थता निर्माण करणारे प्रश्न उपस्थित केले आहेत.
प्राचार्य डॉ राजेंद्र माळी यांनी शुभेच्छा देताना या कादंबरीने आजच्या तरूणांना जगण्याचा मूलमंत्र दिला आहे. तो मोलाचा आहे. असे ते म्हणाले. माजी प्राचार्य दत्ता भगत म्हणाले, राजा मुकुंद वगळता मराठी साहित्यिकांनी बोलीभाषेत लिहायचे असते हे माहीत नसल्यामुळे मराठी बोलीभाषेत साहित्य लिहिणे टाळले. परकीय आक्रमणामुळे आपण आपली बोलीभाषा विसरून गेलो होतो. अध्यक्षीय समारोप करताना वासुदेव मुलाटे म्हणाले की, नांदेड परिसरातून सर्वाधिक कादंबरीकार, ग्रामीण कथाकार निर्माण होत आहेत ही अभिमानास्पद बाब आहे. साहित्यिक जेंव्हा बोलीभाषेत लिहितो, त्यावेळी ती भाषा वाचकांना जवळची वाटत असते. बोलीभाषेची ताकद नेमकेपणाने काय आहे, हे प्रा. डॉ विभुते यांच्या ‘आयास’ कादंबरीने दाखवून दिले आहे. आयास कादंबरी वाचून मराठवाड्यातील नव्या पिढीतील तरुण सशक्त कादंबरी लिखाणासाठी उद्युक्त होतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
सुरुवातीचे शिक्षण गृह भाषेत
नव्या शैक्षणिक धोरणाची घोषणा झाल्यानंतर सर्वात आधी चिंता व्यक्त करण्यात आली ती म्हणजे सरकारी आणि खासगी शाळांमध्ये इंग्रजी माध्यमातील शिक्षणाचे महत्त्व कमी होईल की काय याची. मात्र, ही चिंता निरर्थक आहे. कारण भाषा आत्मसात करण्याची मुलांची क्षमता किती असते, याचा शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास करून, त्यावरून निष्कर्ष काढत शिकण्याची भाषा आणि सूचनांची भाषा काय असावी, यासंदर्भात निश्चित असे धोरण आखून मगच ते सादर करण्यात आले आहे.
मुले आपले पालक, घरातील इतर व्यक्ती आणि समवयस्क मुले यांच्याशी संवाद साधत असताना भाषा आत्मसात करत असतात. विभिन्न भाषा बोलणा-यांच्या सहवासात राहिल्यास मुले एकाचवेळी दोन किंवा जास्त भाषा आत्मसात करू शकतात. अलीकडेच करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार मुलांना जर एखादी दुसरी भाषा शिकायची असेल तर ती उत्तम बोलता, लिहिता आणि वाचता येण्याकरिता तसेच त्या भाषेचे व्याकरण समजून घ्यायचे असेल तर संबंधित भाषा मुलांच्या वयाच्या १०व्या वर्षापासूनच शिकविली जायला हवी.
मुलांच्या भाषा आत्मसात करण्याच्या या क्षमतेविषयीची तपशीलवार संशोधनपर माहिती डॉ. डी. के. कस्तुरीरंगन समिती (एनईपी २०१९चा मसुदा) व भारत सरकार यांना २०२०च्या शैक्षणिक धोरणामध्ये आधीच्या दोन धोरणांप्रमाणेच त्रिस्तरीय भाषा सूत्र पुढे सुरू ठेवण्यासाठी उद्युक्त करती झाली. मात्र, त्यात दोन महत्त्वाचे बदल करण्यात आले : पहिला बदल म्हणजे तीनही भाषा मुलांना त्यांच्या अगदी लहान वयातच – म्हणजे ३ ते ८ वर्षे या टप्प्यात – शिकविण्यास सुरुवात केली जावी आणि पुढे वय वर्षे ८ ते ११ या टप्प्यात त्या भाषांची तयारी करून घेतली जावी. यामागचा उद्देश असा की, बहुविध भाषांमध्ये मुले प्रभुत्व प्राप्त करू शकतील. दुसरा महत्त्वाचा बदल म्हणजे तीन भाषा कोणत्या निवडाव्यात याचे पूर्ण स्वातंत्र्य पालक आणि विद्यार्थ्यांना दिले जावे.
सूचनांचे माध्यम आणि भाषाशिक्षण यांसंदर्भातील शिफारसी शैक्षणिक धोरण, २०२० मधील एका कळीच्या उद्दिष्टाशी संलग्न आहेत, तो म्हणजे इयत्ता ५ वी पर्यंत सर्व मुलांना मूलभूत साक्षरतेचे ज्ञान आले पाहिजे आणि अंक ओळख झाली पाहिजे, जेणेकरून ‘असर’च्या अहवालातील सर्व मुद्द्यांचे निराकरण केले जाईल. मुलांना जी भाषा समजते त्या भाषेत किमान सहा वर्षे त्यांना शिक्षण दिले जायला हवे, हे संशोधनाअंत स्पष्ट झाले आहे. मात्र, अजूनपर्यंत तरी या मुद्द्याकडे भारतात फारसे कोणी लक्ष दिले नव्हते.
आजही प्राथमिक शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांना ज्या भाषेत सूचना केल्या जातात ती भाषा नीटशी समजत नाही (मग ती भाषा इंग्रजी असो वा क्षेत्रीय भाषा), त्यामुळे त्यांच्या शिक्षण क्षमतेवर गंभीर परिणाम होतो. मुलांमध्ये न्यूनगंड तयार होऊन ते शिक्षणात मागे पडू लागतात आणि त्यांच्या मूलभूत साक्षरतेवरच परिणाम होऊ लागतो.
प्रास्ताविकपर भाषणामध्ये कादंबरीचे लेखक शंकर विभुते यांनी लेखना पाठीमागची भूमिका विशद केली. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन प्रा.धाराशिव शिराळे यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रा.डॉ.शंकर भोपाळे यांनी केले. कार्यक्रमास जेष्ठ विचारवंत शेषेराव मोरे, उद्याचा मराठवाड्याचे संपादक राम शेवडीकर, मधुकर राहेगावकर, जगदीश कदम,दत्ता डांगे, महेश मोरे, शिवाजी अंबुलगेकर, श्रीराम गव्हाणे, कमलाकर चव्हाण,दा.मा.बेंडे,छाया कदम, गोविंद नांदेडे,शरद कुलकर्णी, प्रशांत दिग्रसकर, रामप्रसाद तौर,पी.विठ्ठल, अनंत राऊत, नारायण शिंदे, बहुतांश साहित्यिक, रसिक, प्राध्यापक, शिक्षक उपस्थित होते