![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/08/Maharashtra-Cabinet-Expansion-.png)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/08/Maharashtra-Cabinet-Expansion-.png)
गेली अनेक दिवसांपासून रखडलेला एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज अखेर राजभवनात पार पडला. १८ जणांच्या या मंत्रीमंडळात भाजपाचे ९ तर शिंदे गटाच्या ९ आमदारांनी आज राजभवनात राज्यपाल भगत कौशारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर ४० दिवसांनंतर मंत्रीमंडळाचा पहिला विस्तार आज करण्यात आला. या मंत्रीमंडळात एकाही महिला मंत्र्याचा समावेश नाही, तर औरंगाबाद जिल्ह्यातील तीन जणांचा समावेश या मंत्रिमंडळात झाला. यापुर्वी अनैतिक संबंधातून मंत्रीपद गमवावे लागलेल्या संजय राठोड आणि टीईटी घोटाळ्यात दोन मुलींच्या नावाचा समावेश प्रकरणातील अब्दुल सत्तार यांचा ही समावेश झाला आहे.
या मंत्रीमंडळात समाविष्ट झालेले एकनाथ शिंदे गटातील मंत्री
१ उदय सामंत, रत्नागिरी
२ दादा भुसे, मालेगाव
३ गुलाबराव पाटील, जळगाव
४ संदीपान घुमरे, पैठण
५ शंभुराजे देसाई, पाटण
६ दिपक केसरकर,
७ प्रा. डॉ. तानाजी सावंत, परांडा
८ अब्दुल सत्तार, सिल्लोड
९ संजय राठोड, दिग्रस
![](http://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/08/Maharashtra-Cabinet-Expansion-2-1024x576.png)
भाजपाचे मंत्री
१ रविंद्र चव्हाण, डोंबिवली
२ सुरेश खाडे, मिरज
३ चंद्रकांत पाटील, कोथरूड
४ सुधीर मुनगंटीवार, बल्लारपूर
५ गिरीष महाजन, जामनेर
६ राधाकृष्ण विखे पाटील, जामनेर
७ डॉ. विजयकुमार गावित
८ अतुल सावे औरंगाबाद पुर्व
९ मंगलप्रभात लोढा, मुंबई