राष्ट्रीय

“स्वाराती”घ्या सर्जरी विभागाच्या संशोधनाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल; डॉ. नितीन चाटे यांच्या वर अभिनंदनाचा वर्षाव !

"SRT Medical College" bring international recognition to the Department of Surgery research due to Nitin Chate efforts!

हार्नियाच्या ऑपरेशन साठी २००० रुपयांच्या जाळी ऐवजी अवघ्या १२ रुपयांच्या जाळीचा वापर.
अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकिय महाविद्यालयातील सर्जरी विभागाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असुन हर्निया च्या ऑपरेशन साठी मच्छरदाणीची जाळी वापरण्याबाबत विभागप्रमुख डॉ.नितीन चाटे यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या संशोधनाची दखल प्रतिष्ठेचे आंतरराष्ट्रीय वैद्यकशास्त्र नियतकालिक ‘क्युरीयस’ यांनी शोधप्रबंध प्रसिद्ध करुन घेतली आहे.

ग्रामीण भागातील आशिया खंडांतील पहीले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असलेल्या स्वा.रा.ती. रुग्णालयातील शल्यचिकीत्सा विभाग हा ऊपक्रमशील विभाग म्हणून ओळखला जातो. विवीध उपक्रमांसह महात्मा फुले योजनेत राज्यभरात सर्वोत्कृष्ट काम करणारा विभाग अशी ओळख विभागप्रमुख डॉ.नितीन चाटे यांच्या कृतीशीलतेने यापुर्वीच निर्माण झाली आहे. आता या ही पुढे जावून हर्निया या आजारावर ऊपचारांकरीता करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रियेत वापरण्यात येणाऱ्या महागड्या जाळी ऐवजी अत्यंत कमी दरात सहज उपलब्ध होणा-या जाळीचा वापर करून ही महागडी शस्त्रक्रिया अत्यंत स्वतः करणारे संशोधन विभाग प्रमुख डॉ. नितीन चाटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.

हर्निया च्या शस्त्रक्रियेसाठी खुल्या बाजारात ऊपलब्ध असलेल्या 1200 ते 2000 रुपये किंमतीची जाळी वापरण्यात येत होती. ही जाळी या टंचाईग्रस्त भागातील नागरीकांकरीता मोठी खर्चिक बाब ठरत असल्याने अनेक रुग्ण बिगरजाळीच्या शस्त्रक्रियेचा पर्याय निवडत असत.
बिगरजाळीच्या टाक्यांच्या शस्त्रक्रीयेमुळे रुग्णांना अनेक महीने त्रास होऊ शकतो व पुन्हा हर्निया होण्याचा वाढीव धोका असतो.
यावरील पर्यायांचा शोध घेत असताना डॉ.नितीन चाटे यांचे लक्ष दोंडाईचा येथील डॉ.रविंद्र टोनगावकर यांसह जगभरातील विवीध अल्पविकसीत देशांमधील सर्जन वापरत असलेल्या मच्छरदाणीच्या जाळीच्या ऊपयुक्तते कडे गेले. जगभरात यशस्वी झालेला हा स्वस्त आणि स्वस्थ पर्याय रुग्णांना नाममात्र शुल्कामध्ये ऊपलब्ध करण्याचा निर्णय डॉ. नितीन चाटे यांनी घेतला. बाजारात लोकप्रिय असलेली हर्नियाची जाळी पॉलिप्रॉपीलीन या केमिकल नावाची असते तर मच्छरदाणी ही पॉलीइथिलीन या शास्त्रीय नावाची.

पॉलीप्रोपीलीन च्या हर्निया जाळीची किंमत 1200 ते 2000 रुपये इतकी असुन दुसरीकडे स्वाराति येथील संशोधनामध्ये वापरलेली पॉलीइथिलीन मच्छरदाणीची जाळी अवघ्या 12 रुपयांहुन कमी किंमतीत तयार करुन वापरता येते. अशा प्रकारची जाळी वापरुन 2018 पासुन आजपर्यंत तब्बल 1000 हुन अधिक हर्निया शस्त्रक्रिया करण्यात आल्या असुन याची दखल नुकतीच क्युरीयस या आंतरराष्ट्रीय पातळीवरील नामांकीत मॅगझीनमध्ये डॉ.नितीन चाटे यांचा या विषयावरील शोध प्रबंध प्रसिद्ध करुन घेतल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.
या प्रयोगामुळे रुग्णांना कुठलाही त्रास झालेला नसुन 95% रुग्ण समाधानी असल्याचे या प्रबंधातुन समोर आले आहे. या संशोधनासाठी डॉ.नितीन चाटे यांच्या नेतृत्वामध्ये डॉ.भुषण जोगदंड, डॉ.श्रीकृष्ण नागरगोजे व डॉ.महेश बिराजदार यांनी संशोधन सहाय्यक म्हणुन काम केले.

ग्रामिण भागातील या प्रयोगाची आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठित वैद्यकीय क्षेत्रातील दखल ही स्वामी रामानंद तीर्थ शासकीय महाविद्यालयाकरिता अभिमानाची बाब असल्याची प्रतिक्रिया ऊमटत आहे. या जाळीच्या वापरामुळे एकीकडे शासनाची तब्बल 20 लाख रुपयांची महसुल बचत झाली असुन दुसरीकडे महात्मा ज्योतीराव फुले जनारोग्य योजनेतुन या प्रकारच्या हर्निया सर्जरींमधून 85 लाख रुपयांचा महसुल शासनास प्राप्त झाला आहे अशी माहीती शल्यचिकीत्सा शास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ.नितीन चाटे यांनी दिली.
महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.भास्कर खैरे यांच्यासह डॉ. सिद्धेश्वर बिराजदार ,डॉ.शंकर धपाटे, डॉ.राजेश कचरे,डॉ. दिपक लामतुरे, डॉ. चौधरी आदींनी सर्जरी विभागाच्या डॉ.नितीन चाटे यांसह डॉ.जोगदंड, डॉ.नागरगोजे व डॉ.बिराजदार यांचे अभिनंदन केले आहे.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker