विभागीय लोकशाही दिनात सहा अर्जांवर सुनावणी


औरंगाबाद (प्रतिनिधी) :- विभागीय लोकशाही दिनात आज प्राप्त झालेल्या सहा अर्जांवर सुनावणी घेण्यात आली. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात उपायुक्त (सा.प्र.) जगदीश मिनियार यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिन झाला. त्यामध्ये औरंगाबाद,जालना ,परभणी, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच मनपा औरंगाबाद या कार्यालयांशी संबंधित एकूण सहा अर्जांवर सुनावणी घेऊन श्री.मिनियार यांनी संबंधित विभागांनी तत्परतेने योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश यावेळी दिले.
२००७ सालच्या राष्ट्रकूलच्या सर्वसाधारण सभेत या जागतिक लोकशाही दिनाची घोषणा झाली होती.
त्यामागे, एक पार्श्वभूमी होती. फनिर्नंड माकोर्स या फिलीपिनमधल्या हुकूमशहाची २० वर्षांची सत्ता तिथल्या जनशक्ती क्रांतीदलाने उलथवून लावली, तेव्हा तिथल्या नव्या राष्टाध्यक्ष कोसाझोन अक्विनो यांच्या अध्यक्षतेखाली १९८८ साली एक आंतरराष्ट्रीय परिषद भरली होती. अस्तित्वात असलेल्या व नव्याने उदयास आलेल्या प्रजासत्ताक राज्याच्या तत्त्वपूर्ण नियमावलीची प्रतिष्ठना करणे हा या परिषदेचा हेतू होता. या परिषदेच्या कतार, दोहा येथे भरलेल्या सभेत लोकशाहीच्या हितार्थ राष्ट्रकुलाने पुढाकार घ्यावा याचा पुनरुच्चार झाला. पुढे १९९७ च्या सप्टेंबरमध्ये आंतर-लोकसभा संघटनेने लोकशाही मूल्याचा उद्घोष केला नि राष्ट्रकूलाला जागतिक लोकशाही दिन जाहीर करावा लागला.
लोकशाही हे एक सार्वत्रिक मूल्य आहे, ज्यामुळे प्रत्येक नागरिकाला विचार स्वातंत्र्य प्राप्त होते व तो सार्वजनिक बंधने पाळीत मुक्तपणे आपले जीवन जगू शकतो. आपल्या हक्काची मागणी करीत असताना, नागरिकाने आपल्या कर्तव्याचे पालन केले तर लोकशाही अखिल मानवतेला हितकारक ठरते.
लोकसत्ताक राज्याला इंग्रजीत ‘डेमोक्रसी’ हा प्रतिशब्द आहे व तो ग्रीक शब्द ‘डेमोज’ म्हणजे लोकं आणि ‘क्रेटीन’ म्हणजे राज्य करणे, यावरून अप्रभ्रंशित झाला आहे. लोकांनीच राज्य करण्याची प्रथा ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकात ग्रीकांनी सुरू केली होती. समानता आणि स्वातंत्र्याद्वारे सार्वजनिक जीवनात शांती पसरावी हा लोकशाहीचा हेतू असतो. त्यामुळे, सार्वजनिक कामकाजात नागरिकांना हस्तक्षेप करण्याचा अधिकार लाभलेला असतो. मानवी हक्क अबाधित राखून, त्याचे संवर्धन करणे हे लोकशाहीचा तो मुख्य हेतू असतो. त्यासाठी लोकांना नागरी व राजकीय क्षेत्रात महत्त्वपूर्ण भूमिका बजवावी लागते. लिंग, जात, धर्म या सर्वापेक्षाही मानवता महान हेच लोकशाहीचे सूत्र असते. महिलांच्या सहभागाने तर लोकशाहीची शान वाढते. परंतु, लोकसंख्येत अर्धा वाटा असूनही जगातल्या लोकसभांत त्यांचा सहभाग अल्पसा आहे. तो वाढावा म्हणून देखील आजच्या दिवसाची जागृती आहे. प्रत्येक नागरिकाला आपल्या हक्कांची जाणीव करून देणे हा आजच्या दिवसाचा हेतू साध्य झाला तरच, अब्राहम लिंकन यांनी म्हटल्याप्रमाणे ‘लोकांनी लोकांसाठी, लोकांकरवी’ चालविलेले राज्य म्हणजे लोकशाही, हे खरे ठरेल.